दापोली विद्यापीठ बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना नोकरी - वायकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

दाभोळ - दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांवर काळाने घातलेला घाला अत्यंत हृदयद्रावक आहे. एकूण 30 कर्मचारी या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. 

शासनाकडून जाहीर करण्यात आलेली 4 लाख रुपयांची मदत सोमवारी सायंकाळपर्यंत महसूल विभागाकडून दिली जाईल. राज्यातील व देशातील सगळ्या घाटांना बॅरिगेट्स लावणे आवश्यक आहे. याचीही दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, जिल्हाधिकारी प्रदीप पी., नियोजन समिती सदस्य नीलेश शेठ, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, तहसीलदार कविता जाधव आदी उपस्थित होते.

30 पैकी 23 कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपाखाली सेवेत घेण्यात येईल. त्याशिवाय उर्वरित 7 जणांच्या वारसांनाही स्पेशल केस म्हणून सेवेत घेण्यासाठी राज्यपाल, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्याजवळ चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. सातजण वर्ग 2 मध्ये येतात. त्यांच्या वारसालाही नोकरीत घेण्यात येणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून वैयक्तिक प्रत्येकी 10 हजाराची मदत

अपघातात दुर्देवी मृत्यू ओढवलेल्या कुटुंबीयांना वैयक्तिरित्या प्रत्येकी 10 हजारांची मदत दिली असल्याचे पालकमंत्र्यांंनी सांगितले. या घटनेनंतर सगळ्या यंत्रणांनी, एनडीआरफ, पोलिस यंत्रणा, बचाव पथके, ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. त्यांचेही आपण आभार मानतो, असेही वायकर म्हणाले.

Web Title: Ratnagiri News Minister Ravindra Waikar comment