‘मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन’ रत्नागिरी पोलिस पथकात

राजेश शेळके
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - गुन्हेगारी जगतावर जिल्हा पोलिस दलाचा दबदबा आणखी वाढणार आहे. विविध गुन्ह्यांमधील दस्तावेज आणि रासायनिक पुरावे साठवून (प्रिझर्व) ठेवण्याच्यादृष्टीने रत्नागिरी पोलिस दलाच्या ताफ्यात ‘मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन’ दाखल झाली आहे. गुन्ह्यातील पुरावा भक्कम होण्यासाठी ही व्हॅन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग या व्हॅनवर असून अल्पावधित तीन गुन्हे उघड करण्यात व्हॅनचा मोठा हातभार लागला आहे.

अत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज अशी ही व्हॅन आहे. दोन महिन्यांपूर्वी ती रत्नागिरी जिल्हा पोलिस दालाच्या ताफ्यात दाखल झाली. ज्या गुन्ह्यांमध्ये कायद्यात सात वर्षांवर शिक्षेची तरतुद आहे, अशा गंभीर गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी व्हॅनची मोठी मदत होते. फॉरेन्सिक नमुने, डीएनए कीट, ठसे, गोळीबारातील उडालेले बुलेटचे अंश, स्फोटके, अंमली पदार्थ आदी गुन्ह्यातील तसेच रासायनिक पुरावे साठविण्याची १४ कीट त्यामध्ये आहेत. व्हॅन एसी असून त्यामध्ये जनरेटर, टॉवर आदी सुविधा आहेत. व्हॅनवर दोन पोलिस कर्मचारी, एक वरिष्ठ अधिकारी आणि एक प्रशिक्षित कर्मचारी आहे. मुंबईमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर खास या व्हॅनवर त्यांची नियुक्ती केली आहे.  

सोमेश्‍वर येथील तरूणाचा वहाळामध्ये खून झाला होता. दगडावरच त्याचे रक्त सांडले होते. तेव्हा ही व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आधुनिकपद्धतीने रक्ताचे नमुने घेतले. त्याचा या गुन्ह्यांमध्ये फायदा झाला. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीत संशयिताचे ठसे घेतले. कोहिनूर रिसॉर्टमधील चोरीप्रकरणी ठसे घेतले. हे गुन्हे उघड होण्यास मदत झाली. व्हॅनमुळे भविष्यात खून, बलात्कार, गोळीबार, स्फोटके, चरस- गांजा या अंमलीपदार्थाचा गुन्हा आदीबाबत ठोस पुरावे गोळा होतील. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्यादृष्टीने फायदा होणार आहे.

मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व्हॅन गंभीर गुन्ह्यातील दस्तावेज आणि रासायनिक पुरावे साठविण्याच्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. दोन महिन्यात अनेक गुन्हे आम्ही या व्हॅनच्या मदतीने उघड केले. मुंबईत प्रशिक्षण घेतल्यानंतरच व्हॅनवर नियुक्ती झाली. 
- दिनकर वाडेकर, प्रशिक्षित पोलिस कर्मचारी

Web Title: ratnagiri news 'Mobile Forensic Investigation Van' in police squad