कोकणी जनतेचा बळी जाणार नाही - खासदार विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

रत्नागिरी - केंद्र व राज्य शासन नाणार येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेला अंधारात ठेवून सौदी अरेबियाच्या राजाला खूश करण्यासाठी कोकणी जनतेचा बळी घेऊ देणार नाही. काही झाले तरी शिवसेना हा प्रकल्प रद्द करणारच, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. 

स्थानिकांचा कडवा विरोध असलेल्या नाणार (ता. राजापूर) येथील जगातील सर्वांत मोठ्या ग्रीन रिफायनरीची वाट बिकट झाली होती. शिवसेनेने जनतेच्या भूमिकेबरोबर राहण्याची ठाम भूमिका घेत प्रकल्प रद्द करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र सेना सत्तेत असल्याने विरोधकांनी सेनेलाच लक्ष्य केले आहे. सेनेच्याच मंत्र्यांनी नाणारची अधिसूचना काढल्याचे आरोप होत आहेत. त्यात ऑईल कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन प्रकल्प कसा समृद्धीकडे नेणारा आहे, हे दाखवून दिले. त्यानंतर तर शिवसेनेने आपली भूमिका ताठर केली. कंपनीच्या लोकांना नाणारमध्ये फिरकू देणार नाही, असा इशारा खासदार राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी दिला असतानाच भाजपने सेनेला अंधारात ठेवून दिल्लीमध्ये आज सौदी अरेबियांच्या कंपनीशी सामंजस्य करार केला. 

भाजप असे काही करणार असल्याची कुणकुण आम्हाला होती. त्यामुळेच आम्ही काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन सेनेची भूमिका स्पष्ट केली. दिल्लीमध्ये सौदे अरेबियाच्या कंपनीशी नाणार रिफायनरीचा करार करताना सेनेला अंधारात ठेवले. भाजपने किती आदळआपट केली तरी आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही.

-  विनायक राऊत, खासदार

Web Title: Ratnagiri News MP Vinayak Raut comment