कोतवडे-ढोकमळे सुरुबन तोडणार्‍यांवर कारवाई करावी - राऊत

राजेश कळंबटे
गुरुवार, 10 मे 2018

रत्नागिरी - आचारसंहितेचा बाऊ करत पाणीपुरवठ्यासह खड्डे भरणे, शाळा दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. याला जिल्हा परिषद अधिकारी जबाबदार आहेत. त्यांना सरळ करण्यासाठी ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ राबवावा लागेल, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. तसेच कोतवडे-ढोकमळे सुरुबन तोडणार्‍यांवर फौजदारी दाखल करण्यासही त्यांनी सांगितले.

अध्यक्षा स्नेहा सावंत, आमदार उदय सामंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अतिरिक्त सीईओ आर. के. बामणे, आदींच्या उपस्थितीत खासदार राऊत यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.

ढोकमळे येथील सुरुबनाची तोड ग्रामपंचायत करीत आहे. कोटीच्या घरातील किमतीची झाडे दीड लाखात विकली गेली आहेत. फयानमधील पडलेली झाडे तोडण्याची परवानगी घेऊन नवीन सुरुची तोड होत आहे, असा मुद्दा पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. याला रत्नागिरी गटविकास अधिकार्‍यांनी स्थगिती दिली होती; पण ती ग्रामविकास उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी उठविली. त्या अधिकार्‍यांशी दुरध्वनीवरुन संवाद साधत खासदारांनी या प्रकरणी घटनास्थळी जाऊन चौकशी करा असे सांगितले. दोषी असल्यास संबंधितांवर फौजदारी करा अशी सूचना केली.

प्रशासन व्यवस्थित चालविण्यासाठी अधिकार्‍यांना हाताची भाषाच कळत असेल, तर ती येथे वापरावी लागेल. त्यापुर्वी काम चांगले करा.

- विनायक राऊत, खासदार

पेयजलबाबत मंत्री लोणीकर यांनी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. त्याचा दाखल देत राऊत यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. पावसाळा आला तरीही रस्त्यांवरील खड्डे बुजवलेले नाहीत. पावसानंतर एसटी वाहतुक खंडीत होईल. काम वाटप संस्थांनी कागदपत्रे दिली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यावर तोडगा काढून कामे सुरु करा, असे राऊत यांनी आदेश दिले. आचारसंहितेसंदर्भात मार्चमध्ये आलेल्या नवीन शासन निर्णयाचा आधार घेऊन काम करा, असे त्यांनी सीईओ गोयल यांना सांगितले.

Web Title: Ratnagiri News MP Vinayak Raut comment