पुढील मेमध्ये मुंबईहून चार तासांत कोकणात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला जोरदार सुरवात झाली आहे. इंदापूर ते झाराप या ३६६.१७ किमी लांबीच्या कामापैकी ३० किमीचा रस्ता काँक्रिटीकरण करून पूर्ण झाला आहे. एप्रिल/ मे २०१९ अखेर कोकणवासीय आंबे-फणस खायला याच महामार्गाने चार तासांत कोकणात दाखल होतील.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाकडे जातीनिशी लक्ष घातले आहे.  गोगटे महाविद्यालय इमारतीच्या भूमिपूजनाला गडकरी आले असता या महामार्गासंदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. उपलब्ध असलेल्या सर्व्हेअरकडून जमीन मोजूनसुद्धा होणार नाही हे लक्षात येताच २ कोटी खर्च करून खासगी सर्व्हेअरकडून जमीन मोजण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय जागच्या जागी घेतला होता. १.७२ किमी लांबीच्या कशेडी बोगद्यामुळे २५ किमीचा प्रवास वाचेल. 

नितीन गडकरी यांच्या जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीमुळे कोकणात दळणवळण क्षेत्रात परिवर्तन होत आहे. 
- ॲड. विलास पाटणे

Web Title: Ratnagiri News Mumbai-Goa four track highway work