मुंबई - गोवा महामार्गावरील शास्त्री पुलाचे काम सुरू

संदेश सप्रे
सोमवार, 7 मे 2018

संगमेश्‍वर - तांत्रिक कारणामुळे गेले 9 महिने बंद असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या शास्त्री पुलाचे काम कालापासून सुरू झाले आहे. आगामी काळात दिवसरात्र काम करून हा पुल पूर्णत्वास नेणार असल्याची माहिती पुलाच्या ठेकेदाराने दिली. 

संगमेश्‍वर - तांत्रिक कारणामुळे गेले 9 महिने बंद असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या शास्त्री पुलाचे काम कालापासून सुरू झाले आहे. आगामी काळात दिवसरात्र काम करून हा पुल पूर्णत्वास नेणार असल्याची माहिती पुलाच्या ठेकेदाराने दिली. 

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची सुरवात होण्याआधी महामार्गावरच्या 14 छोट्या मोठ्या पुलांच्या चौपदरी आणि दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. या कामांचा प्रारंभ केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. संगमेश्‍वर तालुक्यातील सप्तलिंगी आणि शास्त्री अशा दोन महत्वाच्या पुलांचे काम सुरू करण्यात आले. यातील शास्त्रीचे काम आधी तर सप्तलिंगीचे काम उशिरा सुरू झाले. शास्त्री पुलाचे काम ज्या वेगात सुरू होते. त्याचा वेग पाहता ते दीड वर्षातच पूर्ण होणे अपेक्षीत होते, मात्र गतवर्षी आलेला जीएसटी आणि केलेल्या कामाची बिले या अडचणीमुळे हे काम बंद पडले. डिसेंबर 2017 ला हे काम पूर्णतः ठप्प झाले. यामुळे पुल नक्की कधी पूर्ण होणार असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

दरम्यान, बंद पडलेले काम अनेक महिने ठप्पच राहिल्याने या पुलाचा आराखडा चुकला असून नव्याने पुलाचे बांधकाम सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र आता या पुलाचे काम पुन्हा सुरू झाल्याने शंकेखोरांचे निरसन झाले आहे. 

या पुलाच्या कामाला कालपासून जोमात सुरूवात झाली आहे. महामार्गावरील रखडलेल्या अन्य पुलांचे कामही सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात जास्तीत जास्त वेगाने काम करून हा पुल लवकरच पूर्णत्वास नेणार असल्याची माहिती या पुलाच्या ठेकेदाराने दिली.

Web Title: Ratnagiri News Mumbai-Goa four track highway work start