मुंबई-गोवा महामार्गावर कार अडवून रोकड लुटली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

डेमो कारमधील जखमी कर्मचाऱ्याला पाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लांजा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर नंबर प्लेट नसलेल्या स्विप्ट कारमधून आलेल्या ५ जणांनी वेरळनजीक एका डेमो कारला अडवून सुमारे पावणेदोन लाख रुपयांची रोकड लुटली.

मिळालेल्या माहितीनुसार, कार लुटटल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित कर्मचाऱ्यावर लुटारूंनी दोन ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने जखमा केल्याचे समजते.

डेमो कारमधील जखमी कर्मचाऱ्याला पाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लांजा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ratnagiri news mumbai-goa highway Looted the car