आजोबांचा खून करणाऱ्या नातवास जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

रत्नागिरी - आंगले-पाटवाडी येथे सामायिक जागाजमिनीच्या वादातून वृद्धाचा खून केल्याप्रकरणी त्यांच्या चुलत नातवाला येथील न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

रत्नागिरी - आंगले-पाटवाडी येथे सामायिक जागाजमिनीच्या वादातून वृद्धाचा खून केल्याप्रकरणी त्यांच्या चुलत नातवाला येथील न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

देवेंद्र बबन राऊत (वय 24) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 7 मे 2016 ला पाटवाडी-आंगले येथे घडली होती. पाटवाडी येथे राऊत कुटुंबीय एकाच घरात राहतात. आजोबा, आजी, नातू, पुतण्या असे एकत्र कुटुंब होते. कुटुंबात सामायिक जागाजमिनीचा वाद होता. राजापूर येथे दिवाणी न्यायालयात खटला दाखल आहे. यातून आरोपी देवेंद्र राऊत याने त्याचे आजोबा अनाजी भानुराव राऊत (वय 70) यांच्या डोक्‍यात पहारीने प्रहार केला. त्यात ते ठार झाले. याप्रकरणी फिर्यादी भागीरथी अनाजी राऊत यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित देवेंद्र यास त्याच दिवशी अटक केली होती.

Web Title: ratnagiri news murder crime

टॅग्स