चिपळूणात उभे राहतेय वस्तुसंग्रहालय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

चिपळूण - शहरात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वांत पहिल्या वस्तुसंग्रहालयासाठी हडप्पाकालीन मानवी हत्यारापासून प्राचीन वस्तू, चलन आणि कागदपत्रांसह कोकणाचा इतिहास मांडला जाणार आहे. त्यासोबत कोकणच्या कर्तृत्वाची गाथा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी, असा प्रयत्न आहे. 

चिपळूण - शहरात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वांत पहिल्या वस्तुसंग्रहालयासाठी हडप्पाकालीन मानवी हत्यारापासून प्राचीन वस्तू, चलन आणि कागदपत्रांसह कोकणाचा इतिहास मांडला जाणार आहे. त्यासोबत कोकणच्या कर्तृत्वाची गाथा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी, असा प्रयत्न आहे. 

मागील दोन वर्षांपासून लोकमान्य टिळक मंदिराने कोकणचे पहिले वस्तुसंग्रहालय उभारण्याचे काम सुरू केले. या संग्रहालयात जमा झालेल्या वस्तूची संख्या शेकडोने झाली आहे. डेक्कन शिक्षण संस्थेचे कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांनी या उपक्रमाला मदतीचा हात दिला. डेक्कनच्या संग्रही असलेली हडप्पाकालीन दगडी हत्यारे आदी संग्रहालयासाठी उपलब्ध झाली. 

बहामनी काळातील चांदीचे चलन लादी सापडली. नाण्याच्या आधीचे चलन होते. या शिवाय मराठा राजवटीसह कोल्हापूर, ग्वाल्हेर, झाशी आदी संस्थानची दुर्मिळ कागदपत्रे संकलित केली आहेत. १५६ वर्षांपूर्वीचे चिपळूण कोर्टाचे एक दुर्मिळ समन्स तसेच ईस्ट इंडिया कंपनीची कागदपत्रे सापडली आहेत. दगडी शिल्पाचे विविध प्रकार, जुन्या काळातील धातूची भांडी, कलाकुसरीचे धातूकाम, दिव्याचे प्रकार, चलन, पत्रे आदींनी संग्रहालय उभारणीआधीच जागा अपुरी पडते की काय अशी शंका आहे. सहा भारतरत्नासह एअर मार्शल हेमंत भागवत यांच्यापर्यंत सर्व भूमिपुत्रांच्या कार्याची माहिती तैलचित्राद्वारे केले जाईल. तात्पुरत्या स्वरूपात लोटिस्माच्या जागेत काम होत आहे. नंतर पालिकेने दिलेल्या आठ गुंठे जागेत हे तीन मजली कलादालन होईल.

या ऐतिहासिक संग्रहालयासाठी फार मोठ्या प्रमाणात प्राचीन वस्तू संग्रहित होत आहेत.
 - प्रकाश देशपांडे, 

ग्रंथपाल, लोटिस्मा चिपळूण

संग्रहालयाची वैशिष्ट्ये

  •  विविध राजवटीची नाणी व दुर्मीळ कागदपत्रे
  •  हडप्पाकालीन अश्‍मयुगीन हत्यारे
  •  कोकणच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची तैलचित्रे
  •  प्राचीन कलाकुसरीची भांडी, दगडी शिल्पे, मूर्ती
Web Title: Ratnagiri News Museum in Chiplun