शरद पवार साधणार नाणार प्रकल्पग्रस्तांशी संवाद

राजेंद्र बाईत
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

राजापूर - नाणार प्रकल्पग्रस्तांच्या भेटीसाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पुढील महिन्याच्या दहा तारखेला येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी दिली आहे. 

राजापूर - नाणार प्रकल्पग्रस्तांच्या भेटीसाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पुढील महिन्याच्या दहा तारखेला येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी दिली आहे. 

तालुक्यातील नाणार येथे उभारल्या जात असलेल्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध, त्याला राजकीय पक्षांनी पाठींबा देत दिलेले पाठबळ असे असतानाही शासनाकडून प्रकल्प उभारणी रेटून नेली जात आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी समितीने प्रकल्प हटाव आंदोलनाला बळ देण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना साकडे घातले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांच्या माध्यमातून प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी श्री. पवार यांची भेट घेतली असून नाणारला येवू प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद साधण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी लढ्याला अधिक धार येणार आहे. माजी केंद्रीयमंत्री श्री. पवार पुढील महिन्यामध्ये (ता.10) नाणार येथे येणार आहेत. 

तालुक्यातील नाणार येथे रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी नाणोर परिसरातील चौदा गावांमधील जमिनी संपादीत केली जाणार असून त्याची प्रक्रीयाही सुरू झाली आहे. या प्रकल्प उभारणीला स्थानिकांकडडून तीव्र विरोध केला जात आहे. कोणत्याही स्थितीमध्ये प्रकल्प होवू देणार नसल्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. एका बाजूला प्रकल्पग्रस्तांकडून विरोध केला जात असताना दुसर्‍या बाजूला मात्र, प्रशासनाकडून प्रकल्पाची उभारणी रेटून नेली जात आहे. प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी विविध प्रकारची आंदोलने छेडून प्रकल्पविरोध दाखवून दिला आहे. त्यातच, प्रशासनाने हाती घेतलेली भूमोजणीही ग्रामस्थांनी रोखून धरली होती.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने प्रकल्प उभारणीला विरोध करीत प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला बळ दिले आहे. त्यातच, राष्ट्रवादीसह शिवसेनेना, काँग्रेस, स्वाभिमान पक्ष, मनसे आदींनीही प्रकल्पविरोधी आंदोलनाला पाठबळ दिले आहे. त्यानंतर प्रकल्प रद्द होण्याऐवजी प्रकल्प उभारणीच्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर पावले पुढे पडू लागली आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारणी निश्‍चित मानली जात आहे. अशा स्थितीमध्ये प्रकल्पविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेने राष्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री श्री. पवार यांना साकडे घातले आहे. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. यशवंतराव यांच्या माध्यमातून प्रकल्पविरोधी समितीच्या पदाधिकार्‍यांनी श्री. पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीमध्ये प्रकल्पासंबंधित स्थानिकांच्या असलेल्या भावना मांडून प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी नाणार परिसराला भेट देण्याची विनंती केली. त्यातच, प्रकल्प रद्द करण्यास ग्रामस्थांना सहकार्य करण्याचीही विनंती केली. त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत श्री. पवार यांनी पुढील महिन्यामध्ये (ता.10 मे) नाणार येथे येवून प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे या दौर्‍यात श्री. पवार प्रकल्पग्रस्तांना नेमका कोणता कानमंत्र देणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.  

Web Title: Ratnagiri News Nanar project Issue