कोकण रेल्वे भरती प्रक्रिया आता आॅनलाईन - नंदू तेलंग

राजेश कळंबटे
सोमवार, 29 जानेवारी 2018

रत्नागिरी - कोंकण रेल्वे भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अधिकारी नंदू तेलंग यांनी दिली.

रत्नागिरी - कोंकण रेल्वे भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अधिकारी नंदू तेलंग यांनी दिली.

कोकण रेल्वेने आतापर्यंत 53 टक्के प्रकल्पग्रस्थांना नोकरी दिली आहे. यापूर्वीच्या भरतीत पारदर्शकता नव्हती, असा आरोप कोंकण भूमी प्रकल्पग्रस्त कमिटीने केला होता. या विषयी कोकण रेल्वे प्रशासनाने आपली बाजू मांडली. 

श्री. तेलग म्हणाले, १९९८ पासून कोकण रेल्वेने प्रकल्पामध्ये आत्तापर्यंत ५२०० जणांची भरती केली गेली आहे. त्यामध्ये सुमारे २८०० जण प्रकल्पग्रस्त आहेत. हा मार्ग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यामधून गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ५३ टक्के प्रकल्पग्रस्तांना या भरतीमध्ये संधी दिली गेली आहे. प्रकल्पग्रस्तांसोबत दोन बैठका झाल्या त्यामध्ये नामंजूर झालेल्या नागरिकांच्या तक्रारी संदर्भात आवाहन केले होते. त्याला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहितीही तेलंग यांनी दिली.  

Web Title: Ratnagiri News Nandu Telang comment