सहा पिढ्यांचा साक्षिदार असणारा निवळीतील सुर्वे यांचा वाडा

प्रकाश पाटील
गुरुवार, 7 जून 2018

सावर्डे - चिपळूण तालुक्यातील निवळी येथील सुर्वे हे वतनदार घराणे. गावात 25 घरे सुर्वे खानदानाची. त्यापैकी नारायण रामचंद्र सुर्वे (वय 87) यांचे घर म्हणजे जुन्या काळातील राजवाडा. तीन फुटाच्या भिंती, दुमजली माळा, बांधकाम दगड, विटा, चिऱ्याचे तेही गुळचुन्यात बांधलेले, प्रशस्त आवार. हा 1868 ला वाडा बांधला गेला.

सावर्डे - चिपळूण तालुक्यातील निवळी येथील सुर्वे हे वतनदार घराणे. गावात 25 घरे सुर्वे खानदानाची. त्यापैकी नारायण रामचंद्र सुर्वे (वय 87) यांचे घर म्हणजे जुन्या काळातील राजवाडा. तीन फुटाच्या भिंती, दुमजली माळा, बांधकाम दगड, विटा, चिऱ्याचे तेही गुळचुन्यात बांधलेले, प्रशस्त आवार. हा 1868 ला वाडा बांधला गेला. आजही सहावी पिढी या घरात सुखरूपपणे राहते. घरात असलेल्या प्राचीन वस्तूंचा संग्रह हे या घरातील आणखी एक वैशिष्ट्य.

प्रशस्त जोता, जोत्यावर देवघर, माळ्यावर लावलेले लाकडी सागाचे भाले म्हणजे आरसीसी बिंब इतक्या जाडीचे, आत खोल्या त्यानंतर घराच्या मध्यभागी मोकळा चौक त्यानंतर सभोवती शयनगृह आणि स्वयंपाक घर. जिना विटांचा, जुन्या काळची भिंगरोऴी कौल बदलून मंगलोरी कौले नव्याने घातली इतकाच बदल. दाराला बाहेरून कडीच नाही. घर माणसाविना राहू नये. माळ्यावर पाच- पाच खंडीची भाताची तीन कोठारे यावरून सुर्वेंच्या खानदानाची ओळख होते. 

दिवंगत नारायण सुर्वे यांचा मुलगा रामचंद्र, त्यांचा मुलगा नारायण त्यांची मुले गुलाब, कमलाकर, विनायक व त्यांची मुले आणि नातवंडे अशा सहा पिढ्या गुण्यागोविंदाने येथे नांदत आल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील नायरी-शृंगारपूर येथील मूळचे सुर्वे निवळीत स्थायिक झाले.

माझ्या आजोबांनी बांधलेल्या वास्तूचे आम्ही जतन केले. पुढील पिढ्यादेखील करतील. घर आणखी शंभर वर्षे सुखरूप राहील यात शंका नाही. योग्य वेळी त्याची डागडुजी करत आलो आहोत. भविष्यात ऐतिहासिक वास्तू ,स्थापत्यशास्त्राचा नमुना आणि सामूहिक कुटुंबाचा आदर्श पिढीपुढे ठेवता येईल.

-  नारायण सुर्वे, सुर्वे घराण्याचे तिसऱ्या पिढीचे वारसदार     

Web Title: Ratnagiri News Narayan Surve wada Nivali