समाजकल्याण सभापती निवास, की दलालांचा अड्डा - नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी शिवसेनेने ताकद पणाला लावली आहे. मात्र शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतींचे शासकीय निवास्थान हा नाणार प्रकल्पातील जमिनीचे व्यवहार करणाऱ्या दलालांचा अड्डा बनला आहे. यावरून शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा पोलखोल झाला आहे, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी करून शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. 

नीलेश राणे म्हणाले, ‘‘शिवसेना नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी देखावा करीत आहे. सत्तेत राहून त्यांना एक अधिसूचना काढल्यास प्रकल्प रद्द करता आला असता. मात्र उद्योगमंत्री ते करत नाहीत. 

वापर होत असल्यास पक्षांतर्गत कारवाई 
सभापतींच्या शासकीय निवासस्थानाचा नाणार येथील जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांना राहण्यासाठी वापर केला असेल तर ते चुकीचेच आहे. आम्ही याचे समर्थन करणार नाही. संबंधितांवर लवकरच पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. यासंदर्भात कामतेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने बोलू शकत नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर यांचे टीआरपी येथील शासकीय निवासस्थान रिफायनरीची जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांचा अड्डा बनले आहे. पदाधिकाऱ्यांच्या सूचनेशिवाय हे निवासस्थान वापरता येणार नाही. अनेक दिवस हे लोक तिथे राहत आहेत. त्यामुळे शिवसेनेची दुटप्पी भूमिका उघड झाली. 
नाणार प्रकल्पावरून शिवसेनेवर अनेक आरोप होत आहेत.

त्यात राणे यांनी पदाधिकाऱ्याचे नाव घेऊन केलेल्या आरोपाची भर पडली. सत्तेत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनीच अधिसूचना काढून नाणार प्रकल्प मंजूर केला. आता शिवसेनाच हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्‍वासन देत आहे. स्थानिकांचा विरोध तीव्र झाल्यामुळे तेथे सेनेची प्रतिमा खराब होणार, याची पूर्ण जाणीव पक्षाला होती. त्यामुळे स्थानिक आमदारांपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांबरोबर असल्याची भूमिका घेतली. तरी ती खरी नाही, असे नीलेश यांनी सुचवले. 

Web Title: Ratnagiri News Nilesh Rane comment