शिवसेना पूर्वीसारखी राहिलेली नाही - नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

रत्नागिरी - शिवसेना पूर्वीसारखी राहिलेली नाही. तिथे आता फक्‍त व्यापार होतो. कोकणात एकही आमदार निवडून आला नाही, तर उद्धव ठाकरे इकडे फिरकणार पण नाहीत, असे सांगत माजी खासदार नीलेश राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले.

रत्नागिरी - शिवसेना पूर्वीसारखी राहिलेली नाही. तिथे आता फक्‍त व्यापार होतो. कोकणात एकही आमदार निवडून आला नाही, तर उद्धव ठाकरे इकडे फिरकणार पण नाहीत, असे सांगत माजी खासदार नीलेश राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले.

‘स्वाभिमान’ पक्षाच्या रत्नागिरीतील युवक मेळाव्यात नीलेश यांनी तरुण पिढीला मोबाईलचा वापर फक्‍त अभ्यासासाठी करा असे आवाहन केले. या वेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर, नित्यानंद दळवी, अविनाश पावसकर, योगेश मगदूम उपस्थित होते. कार्यकर्ता कसा घडतो याचे उदाहरण देताना बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांची उदाहरणे दिली.

नारायण राणेंनी शिवसेनेत असताना केलेल्या चाळीस वर्षाच्या अथक परिश्रमांची आठवण भावी पिढीला करून दिली.
राणे म्हणाले, ‘‘बाळासाहेब निघायचे तेव्हा त्यांच्या मागे दोनशे गाड्यांचा ताफा असायाचा. त्यांना कधी डिझेल, पेट्रोल मागायची गरज भासली नाही. उद्या कसे होईल याची भ्रांत नव्हती. घरून आणलेल्या डब्यावर पोट भरायचे. आता ती परिस्थिती शिवसेनेत राहिलेली नाही. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे सर्व काही अवलंबून आहे.’’ 

अविनाश पावसकरसारख्या कार्यकर्त्याला रोजगार दिला. ते आज पूर्वीपेक्षाही जोमाने काम करीत आहे. पन्नास टक्‍के राजकारण आणि पन्नास टक्‍के पोट भरणे. पोट भरले तरच गाडी पुढे चालेल, अन्यथा काहीच होणार नाही.

ज्या मातीने वडिलांना मुख्यमंत्री बनवले त्या मातीसाठी काहीतरी करायचे या उद्देशाने रत्नागिरीतील वाडीवस्तीवर काम करत फिरतोय.
- नीलेश राणे,
माजी खासदार

Web Title: Ratnagiri News Nilesh Rane comment