एक संधी द्या, विकास करूनच दाखवतो - नीलेश राणे

राजेश कळंबटे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी आहे. प्रसंगी केसेस झाल्या तरी चालतील; मात्र खरा विकास करायचा असेल तर सभागृहात जाणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत शिवसेनेला संधी दिली, आता एक संधी मिळाली तर विकास कसा करायचा, हे दाखवून देऊ, असा विश्‍वास स्वाभिमानचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्‍त केला. 

येथील मेळाव्यात ते बोलत होते. राणे म्हणाले, रत्नागिरीत सभा घेण्याचे धाडस फक्‍त राणेच करू शकतात. या मतदारसंघात गेली दहा वर्षे काम करतो. खासदार असताना सर्वाधिक निधी खर्च केला. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर वचक होता. गेल्या चार वर्षात हे चित्र पालटले आहे. शिवसेना त्याला कारणीभूत आहे. खासदारांनी रत्नागिरीतील कुठच्या तरी एका टाकीखाली सभा लावली. त्यांच्याजवळील गर्दी पाहा आणि स्वाभिमानची सभा पाहा. लगेच सगळ्यांच्या लक्षात येईल. रत्नागिरीचे आरोग्य बिघडले आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. आम्ही ट्रेनमध्ये आहोत हे लक्षात आल्याने स्थानिक आमदार डबे बदलतात. ते रत्नागिरीचा काय विकास करणार, असा प्रश्‍नही उपस्थित त्यांनी केला. 

खासदार, आमदार, जिल्हा परिषद सेनेचा मात्र येथील तरुण रोजगारासाठी सुकले, आंबा बागायतदार न्यायासाठी मुकले अशी येथील परिस्थिती आहे. मच्छीमार, कुणबी समाजासह प्रत्येक संघटना समस्या सुटतील या अपेक्षीत आहेत. राणे जो शब्द देतील, तो ते पूर्ण करतील असा विश्‍वास आहे. कोकणात येणाऱ्या प्रकल्पांच्या जमिनी विकण्यासाठी शिवसेनेचे सदस्य पुढे असतात. जैतापूर रद्द करू, अशी घोषणा करणाऱ्या खासदारांनी ती पूर्ण केली, का असा प्रश्‍न उपस्थित करत नीलेश राणे यांनी खासदार राऊत यांना लक्ष केले. 

आरक्षणासाठी सर्वांचा पाठिंबा 
मराठा आरक्षण सर्वात आधी आम्ही मागितले. रत्नागिरीत बैठक बोलाविली, तेव्हा सर्वच समाजाच्या लोकांनी माझ्या मागे उभे राहण्याचे आश्‍वासन दिले, असे राणे यांनी सांगितले. 

Web Title: Ratnagiri News Nilesh Rane comment