रिफायनरी प्रकल्पाविरोधात आठ फेब्रुवारीला नाणारमध्ये सभा - निलेश राणे

राजेश कळंबटे
बुधवार, 31 जानेवारी 2018

रत्नागिरी - येत्या ८ फेब्रुवारीला रिफायनरी विरोधात  नाणारच्या परिसरात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची जाहीर सभा होणार आहे, असे माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस  निलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

निलेश राणे म्हणाले की आमचा रिफायनरीला हा सुरुवातीपासून कायमचा विरोध आहे. आमच्या कोकणामध्ये असे पेट्रोकेमिकल रिफायनरी येऊ देणार नाही. पहिल्यापासून जी भूमिका घेतली ती आम्ही बदलली नाही. रिफायनरी प्रकल्प परत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.    

आम्ही जनतेच्या सोबत आहोत,  त्यांची साथ आम्ही सोडणार नाही, हे दाखवण्यासाठी तसेच शिवसेनेची दुपटी भूमिका काय आहे. लोकांना किती खोट बोलतात. या दोन्ही गोष्टी सांगण्यासाठी येत्या ८ फेब्रुवारीला नाणारच्या परिसरात जाहीर सभा घेणार आहोत. 

-  निलेश राणे, माजी खासदार

शिवसेनेचा खरा चेहरा उघडणार आहोत. जनतेची साथ राणे कधीच सोडत नाही. नाणारला जी काही रिफायनरी येत आहे, परत सरकारने जिथं न्यायचं आहे. तिथं नेऊ दे, परंतु आमच्या कोकणामध्ये येऊ देणार नाही, असेही निलेश राणे म्हणाले

Web Title: Ratnagiri News Nilesh Rane Press