बासमतीला कोकणचा स्वाद

नरेश पांचाळ
मंगळवार, 22 मे 2018

रत्नागिरी - बासमतीचा आस्वाद घेता यावा यासाठी शिरगाव येथील कोकण कृषी संशोधन केंद्राने संशोधन करून ‘बासमती‘ बियाणे तयार केले आहे. हे बियाणे प्राथमिक, महाराष्ट्र, नॅशनल स्टेजपर्यंत आले आहे. दोन वर्षात कोकणात बासमती बियाणे मिळेल.

केंद्र भात बियाण्याच्या नवनवीन जाती निर्माण करते. केंद्रात नवीन वाण तयार झाल्यानंतर त्या जातीचा  शोधून त्यातून नवीन बियाण्याच्या निर्मिताला नाव देण्याचे काम प्रत्यक्ष शेतावर सुरू आहे. कृषी संशोधन केंद्राने तयार केलेल्या आजवरच्या अनेक जाती शेतकर्‍यांपर्यत पोहचल्या. त्यातून उत्पादकता वाढत आहे.

भाताच्या रत्नागिरी 24, रत्नागिरी 73, रत्नागिरी 711, रत्नागिरी 1, रत्नागिरी 4, रत्नागिरी 3, कर्जत 6, कर्जत 5, समुद्रसपाटीचा भाग असल्यामुळे खार जमिनीसाठी पनवेल- 1, 2, 3, अशा सुधारित जातींना दरवर्षी वाढती मागणी आहे. 

भात बियाण्याच्या नवीन जाती तयार करण्यासाठी सुमारे 24 गुंठ्यावर भात शेती आहे. या बियाण्यातील नर-मादी वेगळे करावे लागते. जेणेकरून लागवडीसाठी योग्य असे नवीन जातीचे बियाणे शेतकर्‍यांपर्यत पोहचवता येईल. नवीन बियाण्यासाठी सहा टप्पे पूर्ण झाल्या की, त्यांच्या गटानुसार ब्रिडिंग करून त्याला नवीन नाव देण्यात येते. संशोधन केंद्रातून लाल भातही तयार झाले आहे. बासमतीचेही टप्पे सुरू असून येत्या दोन वर्षात कोकणात बासमती बियाणे शेतकर्‍यांना मिळणार आहे.

कृषी संशोधन केंद्रातून तयार झालेल्या ‘रत्नागिरी-8‘ या भातबियाण्याची निवड देशपातळीवर झाली आहे. या बियाण्यांची तीन वर्षात चाचणी होऊन एक नंबरला आले. नोटीफिकेशनसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

- डॉ. भरत वाघमोडे, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, शिरगाव

Web Title: Ratnagiri News now Basamati in Konkan