साखरपा- मुर्शी येथे मोटार अपघातामध्ये आरोग्यसहाय्यिका ठार

प्रमोद हर्डीकर
रविवार, 4 मार्च 2018

साडवली - देवरुख शिवाजी चौक येथील होलसेल अगरबत्तीचे व्यापारी महेश मांगले (वय ४५) यांच्या मोटारीला रविवारी पहाटे चार वाजता साखरपा मुर्शी जाधववाडी जवळ अपघात झाला.  चालकाचा ताबा सुटल्याने मोटार मोरीवरुन खाली कोसळली. या अपघातात सायले प्राथमिक केंद्राच्या आरोग्यसहाय्यीका पद्मा नलावडे( वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. 

या अपघातात स्वतः महेश मांगले जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साखरपा येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे हलवले आहे. तर चालक संतोष खामकर (रा. देवरुख) हे देखील या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरहून महेश मांगले अगरबत्तीचे सामान घेवून मोटारीने येत होते . साखरपा येथे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार मोरीवरुन खाली कोसळली. या अपघातामध्ये पद्मा नलावडे यांचा धक्क्याने मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पद्मा नलावडे या एनआरएचएम मधून सायले प्राथमिक आरोग्य केंद्रात सहाय्यक आरोग्यसेविका म्हणून काम पहात होत्या. त्यांचे कामही उत्तम होते. गतवर्षी नलावडे यांना आदर्श कर्मचारी म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गौरवले होते. 

Web Title: Ratnagiri News one dead in an accident near Sakharpa