रेल्वेतून पडून देवगडचा तरूण जखमी

संदेश सप्रे
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

देवरुख - कोकण रेल्वे मार्गावर कोकण कन्या एक्सप्रेसने मुंबई ते सिंधुदुर्ग असा प्रवास करणारा तरुण संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द येथे पडून गंभीर जखमी झाला आहे .हा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास झाला.  

देवरुख - कोकण रेल्वे मार्गावर कोकण कन्या एक्सप्रेसने मुंबई ते सिंधुदुर्ग असा प्रवास करणारा तरुण संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द येथे पडून गंभीर जखमी झाला आहे .हा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास झाला.  

रुपेश शशिकांत साटम (30 रा.  देवगड ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत ट्रॅकमनने खबर दिल्यावर संगमेश्वर स्थानक मास्तरांनी याची माहिती पोलिसांना दिली. रेल्वेतून पडल्याने रूपेशचा उजवा पाय तुटल्याने खूप रक्तस्राव झाला. 

रेल्वे कर्मचाऱ्यांनी  तात्काळ ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला व 108 रुग्णवाहिकेद्वारे त्याला  संगमेश्वर ग्रामीण  रुग्णालयात दाखल केले तिथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Ratnagiri News one injured in accident