ओल्या कचर्‍यापासून घरच्या घरी खतनिर्मिती

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 1 जून 2018

रत्नागिरी - अभ्युदयनगर येथील रहिवासी सोनाली सावंत यांनी ओल्या कचर्‍यापासून घरच्या घरी खत बनवले आहे. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद त्यांनी हे खत बनवले. त्यांच्याप्रमाणे सदनिकाधारकही असे खत बनवू शकतात.

रत्नागिरी - अभ्युदयनगर येथील रहिवासी सोनाली सावंत यांनी ओल्या कचर्‍यापासून घरच्या घरी खत बनवले आहे. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद त्यांनी हे खत बनवले. त्यांच्याप्रमाणे सदनिकाधारकही असे खत बनवू शकतात.

काही महिने घरासमोरील झाडे नीट वाढत नसल्याचे सौ. सावंत यांच्या लक्षात आले. यावर अभ्यास करताना त्या फेसबुकच्या ‘गच्चीवरील मातीविरहित बाग’ या ग्रुपला जोडल्या गेल्या. नियमित मार्गदर्शनातून त्यांनी तीन महिन्यापासून 75 किलोच्या एका पिंपात घरातील ओला कचरा साठवण्यास सुरवात केली. भाडेकरूदेखील ओला कचरा त्यात टाकू लागले. मातीचा थर, हिंग हळद, मीठ, मुंग्यांची पावडर, तांदुळाचे गूळ घालून पाणी, अंड्यांची साल, चहा पावडर अशा विविध प्रकारच्या प्रक्रिया करणार्‍या घटकांचा वापर करत हे काम पुढे सरकत होते.

एकदा कलिंगड आणि आंबे टाकल्याने त्यात अळ्यासुद्धा झाल्या. पण लगेचच त्यात योग्य ती पावडर टाकून त्यांचा नायनाट केला. पुन्हा खत प्रक्रिया मूळपदावर आणली. सर्व खत चाळून घेऊन ते झांडांसाठी वापरले

केलेल्या प्रयत्नाचे, मेहनतीचे सार्थक झालेच. आता झाडं उत्तम पद्धतीने फुलतील याचा आनंद जास्त आहे. पालिका सतत आवाहन करते. प्रत्येक घरी असे खत बनवून प्रत्येकाने स्वच्छतेच्या अभियानात खारीचा वाटा उचलला तरी खूप घाण कमी होईल.

-  सोनाली सावंत

 

Web Title: Ratnagiri News organic compost manufacture from wet waste

टॅग्स