रत्नागिरीत रंगताहेत पालखी नृत्य स्पर्धा

अमोल कलये
मंगळवार, 27 मार्च 2018

रत्नागिरी -  संस्कृती आणि परंपरेची वेगळी ओळख असलेल्या कोकणात पालखी नृत्य स्पर्धा रंगत आहेत. आपल्या ग्रामदैवतेची पालखी लीलया खेळवत भाविक त्याचा आनंद घेत आहेत.

रत्नागिरी -  संस्कृती आणि परंपरेची वेगळी ओळख असलेल्या कोकणात पालखी नृत्य स्पर्धा रंगत आहेत. आपल्या ग्रामदैवतेची पालखी लीलया खेळवत भाविक त्याचा आनंद घेत आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी गावातील श्री महालक्ष्मी पालखी नृत्य संघाने जोरदार कामगिरी करत सलग पाच वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी सादर केलेले आदिवासी ढोलनृत्य, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळ्यांसोबत असलेला देखावा सर्वाचे लक्ष वेधून घेतो आहे. महाराज स्वहस्ते पालखीची पुजा करतात आणि मग खऱ्या अर्थानं पालखी नृत्याला सुरुवात होते.

ढोलवादन त्याचबरोबर त्याच्या तालावर थिरकणारी पावले. खांद्यावर पालखी..हा अभुतपुर्व सोहळा डोळ्याचे पारणे फेडून जातो. या पालखी नृत्य स्पर्धेत शिवाजी महाराजांची कलाकृती लक्षवेधी ठरली आहे. आजच्या पिढीला शिवाजी महाराज यांचा पराक्रम समजावा यासाठी उद्देशाने श्री महालक्ष्मी पालखी नृत्य संघातर्फे शिवाजी महाराजांचा देखावा साकार केला जातोय. या देखाव्याची छाप अनेकांच्या मनावर उमटली आहे. 

 आत्तापर्यंत जाकादेवी मंदिर रनपार, नवलाई व सांब रवळनाथ मंडळ तोणदे, सांब रवळनाथ उत्सव मंडळ चिंचखरी, श्री राम मंडळ भाटकरकोंड, साई सेवा मंडळ वायंगणकरवाडी आंबेशेत या ठिकाणी या संघाने आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम श्री महालक्ष्मी पालखी नृत्य संघातर्फे केले जात आहे. 

Web Title: Ratnagiri news Palakhi Dance competition