#SaathChal पावस येथून पायी दिंडी निघाली पंढरपूरला

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 5 जुलै 2018

रत्नागिरी - श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाचे औचित्य साधून आजपासून पावस येथील स्वामी स्वरुपानंद  समाधी मंदिरापासून पायी दिंडीस प्रारंभ झाला. पंढरपूरला निघालेल्या या पायी दिंडीमध्ये सुमारे 70 वारकरी सहभागी झाले आहेत. आज नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात दिंडीने मुक्काम केला.

ओम राम कृष्ण हरी असा नामजप करत दिंडीला सुरूवात झाली. पावस ते पंढरपूर हे अंतर 335 कि. मी. आहे. पायी दिंडी सोहळ्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागतो. नाणिज, मुर्शी, बेळाणे, पैजारवाडी, कोल्हापूर, हालोंडी, निमशिरगाव, मिरज, शिरढोण, नागज, कारंडेवाडी, बामणी येथे दिंडी मुक्काम असणार आहे. 20 जुलैला दिंडी पंढरपूरला पोहोचेल.

Web Title: Ratnagiri News Pavas to Pandharpur Wari