पुणे-मडगाव विशेष गाडी ८ जूनला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

रत्नागिरी - पुणे-मडगाव (०२०११) दरम्यान सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी पुणे येथून १८:४५ वाजता शुक्रवारी (८ जून) सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.५ वाजता मडगावला पोचेल.

ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि करमाळी या स्थानकावर थांबेल.  गाडीला १५ डबे असतील. त्यात २ वातानुकूलित, ११ आरक्षित, चेअर कार २ कोच आणि एसएलआर २ कोच आहेत. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी केले आहे.

Web Title: Ratnagiri News Pune - Madgaon Special train on 8 June