गुटखा उत्पादनाला आशीर्वाद कोणाचे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

चिपळूण - तालुक्‍यातील कालुस्ते जांभूळ कोंडा भागात गेले नऊ महिने गुटखा बनविण्याचा कारखाना सुरू होता. तो कोणाच्या आशीर्वादाने इतका काळ सुरू राहिला आणि कोणालाच त्याची माहिती कशी मिळाली नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. पोलिस किंवा स्थानिकांना गुटखा बनत असलेल्या कारखान्याची गंधवार्ताही कशी नाही, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. गुटख्याची विक्री करणारे व्यापारीही चौकशीच्या रडावर येणार आहेत. 

कालुस्ते जांभूळ कोंडा येथील हसीना परकार यांचे जुने घर काही वर्षांपासून बंद होते. त्याठिकाणी कोणीतरी भाडोत्री आले असावे, असा समज होता. त्या परिसरात गेल्यानंतर गुटख्याचा वास येत असताना येथील कोणीच त्याची तक्रार पोलिसांकडे का केली नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे, पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने कालुस्ते येथे छापा टाकून 16 लाख 84 हजार 510 रुपयांचा गुटखा आणि गुटखा बनविण्याची यंत्रसामग्री जप्त केली. महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन आणि विक्रीला बंदी आहे; परंतु कर्नाटकातून अवैध मार्गाने राज्यात गुटखा येतो. कोल्हापूरमार्गे त्याची कोकणात तस्करी केली जाते.

कोल्हापूर ते चिपळूण एसटीने गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीवर दीड वर्षापूर्वी चिपळूण पोलिसांनी कारवाई केली होती. त्या वेळी 60 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला होता; परंतु चिपळुणात गुटखा बनविण्याचा कारखाना आहे, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. गुटखा उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्याची ही चिपळुणातील पहिलीच घटना आहे. बनावट गुटखा बनविणारा मोहसीन मेमन हा तरुण गुजरातमधील आहे. राजस्थानमधील दोन तरुणांच्या मदतीने तो हा कारखाना चालवत होता. 

मोहसीन मेमन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात आहे. मेमन हा एकटाच कारखाना चालवत होता, की स्थानिक लोकही त्याच्यात सहभागी आहेत, याची चौकशी केली जाणार आहे. त्याशिवाय, मेमन स्थानिक बाजारपेठेत कुणाला गुटखा विकत होता, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. 

गुटखा बनवत असल्याच्या कारखान्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीच कारवाई केली. मोहसीन हा एकटाच कारखाना चालवत होता, की त्याचे साथीदार होते, स्थानिक बाजारपेठेत तो कोणाला गुटखा विकत होता, याची चौकशी अन्न व औषध प्रशासन विभाग करणार आहे. त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली की आम्ही सहकार्य करू. 
- निशा जाधव, पोलिस निरीक्षक, चिपळूण 

Web Title: ratnagiri news raid on Gutaka Factory