रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

साडवली - रत्नागिरी जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसाने सकाळी फिरायला जाणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 

साडवली - रत्नागिरी जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसाने सकाळी फिरायला जाणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 

गेले दोन दिवस देवरुख साडवली परीसरात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. मंगळवारी दुपारी पावसाचे काही थेंब नागरीकांनी अनुभवले होते. मात्र बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आंबा व काजूचे नुकसान होण्याची शक्यता बागायतदार व्यक्त करत आहेत. ढगाळ वातावरण व पाऊस फळगळीस कारणीभूत ठरतो. 
.

Web Title: Ratnagiri news Rains in District

टॅग्स