राजापूरात ऐतिहासिक तोफा गायब 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

रत्नागिरी - राजापुरातील दोन ऐतिहासिक तोफा आणि चार तोफगोळ्यांपैकी एक तोफ आणि चारही गोळे कोठे गायब झाले याचा पत्ताच लागत नाही. महसूल खात्याने याबाबत उत्तर देताना जड वस्तू संग्रहालयात आढळ होत नाही, असे उत्तर दिले. दोन नव्हे, तर पाच तोफा अशी नोंद महसूल दप्तरी आहे. गायब तोफा चार की एक हा घोळ आहेच.

रत्नागिरी - राजापुरातील दोन ऐतिहासिक तोफा आणि चार तोफगोळ्यांपैकी एक तोफ आणि चारही गोळे कोठे गायब झाले याचा पत्ताच लागत नाही. महसूल खात्याने याबाबत उत्तर देताना जड वस्तू संग्रहालयात आढळ होत नाही, असे उत्तर दिले. दोन नव्हे, तर पाच तोफा अशी नोंद महसूल दप्तरी आहे. गायब तोफा चार की एक हा घोळ आहेच.

राजापुरातील राजाभाऊ रसाळ यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यांनी सांगितले की, 1967 पासून तहसीलदार कार्यालयावर प्रवेशद्वारावरच तोफा होत्या. छत्रपती शिवरायांनी राजापूरची वखार लुटली. इंग्रजांना जेरीस आणले, असा इतिहास आहे. तोफा मावळ्यांच्या असोत वा इंग्रजांच्या त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहेच. राजापुरात शिवरायांचे स्मारक उभारण्याच्या काळात तोफा बघायला रसाळ आदी गेले, तो जाग्यावर एकच तोफ दिसली. त्यामुळे पाठपुरावा सुरू झाला. 2 जून 2017 ला तोफेचे काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर महसूलने समाधानकारक उत्तर दिले नाही. म्हणून माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करावा लागला. तेव्हा पाच तोफा व पाच गोळे असल्याची माहिती पुरवली. त्यामुळे चार तोफा व गोळे कोठे गेले, याची माहिती त्यांनी मागितली. परंतु त्याचे उत्तर त्यांना मिळालेले नाही.

ऐतिहासिक ठेव्याबाबत महसूल खात्याची अनास्था अत्यंत खेदजनक आहे. तोफांचा विषय बाजूला राहून रसाळ यांनी आता यंत्रणेलाच कामाला लावले आहे. यासाठी त्यांना यंत्रणेशी संघर्ष करावा लागला. 20 जुलैला वरिष्ठ अधिकार्‍यांनी बैठक बोलावली आहे.

तोफा सहजासहजी नेणे शक्य नाही

सदर तोफा 50 ते 70 किलो वजनाच्या आहेत. त्यामुळे सहजासहजी त्या कोणी नेण्याची शक्यता नाही. पूर्वी जुनी वखार येथे तहसील कार्यालय होते. तेथून कार्यालय हलवताना तोफा हलवल्या का, याबाबतही काही माहिती दिली जात नाही. महसूलकडून माहिती देण्यापेक्षा ती दडवण्याचे काम होते, असे रसाळ यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Rajapur historic gun disappears