राजापुरात नगराध्यक्षपदासाठी १५ जुलैला मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

राजापूर - येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. त्यामुळे शहरामध्ये राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या जोर-बैठकांसह राजकीय खलबतांना सुरवात झाली आहे. मंगळवारपासून (ता.१९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे. १५ जुलैला मतदान होणार आहे. 

गतवर्षी पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे नगराध्यक्ष हनिफ काझी जात पडताळणीमध्ये अपात्र ठरल्याने हे पद रिक्त होते. या निवडणुकीसाठी इच्छुकांनी हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. 

नगराध्यक्ष किंगमेकर असल्याने चुरस
सतरा सदस्य असलेल्या पालिकेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. काठावरचे बहुमत असलेल्या आघाडीने एकमेव नगरसेवक असलेल्या भाजपला सभापतिपद देऊन त्यांचा पाठिंबा मिळविला आहे.

शिवसेना विरोधी बाकावर आहे. पालिकेतील राजकीय बलाबलमध्ये नगराध्यक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण आणि निर्णायक आहे. त्यामुळे पालिकेचे सत्ताधीश होण्यासाठी आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवडून यावा म्हणून सर्वच राजकीय पक्षांकडून कंबर कसली जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

निवडणूक कार्यक्रम 
 उमेदवारी अर्ज दाखल करणे ः १९ ते २५ जून
 उमेदवारी अर्जांची छाननी ः २६ जून
 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ः २ जुलै
 मतदान ः १५ जुलै
 मतमोजणी ः १६ जुलै

Web Title: Ratnagiri News Rajapur Palika Election