रमेश कदमांना दिलेला शब्द काँग्रेसने पाळला

मुझफ्फर खान
गुरुवार, 3 मे 2018

चिपळूण - काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना तीन वर्षे वाट पाहावी लागली. जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रमेश कदम, तर आमदार हुस्नबानू खलफे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तीन वर्षानंतर काँग्रेसला कदम यांच्या रूपाने जिल्हाध्यक्ष मिळाला. 

चिपळूण - काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना तीन वर्षे वाट पाहावी लागली. जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रमेश कदम, तर आमदार हुस्नबानू खलफे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तीन वर्षानंतर काँग्रेसला कदम यांच्या रूपाने जिल्हाध्यक्ष मिळाला. 

रमेश कीर यांनी राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे आणि काँग्रेस श्रेष्ठींमधील अंतर्गत वादामुळे नवीन जिल्हाध्यक्ष नेमला गेला नव्हता. नीलेश राणे यांना जिल्हाध्यक्ष करण्याचा प्रयत्न झाला. परंतु आमदार भाई जगताप यांच्या पाठीराख्यांनी विरोध केल्याने मुंबईतच ही मोहीम बारगळली.

श्री. कदम यांना काँग्रेसमध्ये घेताना जिल्ह्यातील काँग्रेसची सूत्रे त्यांच्या हाती देण्याचे आश्‍वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. आमदार हुस्नबानू खलिफे, राजापूरचे सदानंद गांगण, चिपळूणचे इब्राहिम दलवाई, सुधीर दाभोळकर, देवरूखचे अशोक जाधव असे नेते इच्छुक होते. मात्र पक्षाने कदम यांना दिलेला शब्द पाळला. खलिफे यांची कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांची समजूत काढली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, केंद्रातील प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश हे बुधवारी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधी सभेसाठी राजापूरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत श्री. कदम व सौ. खलिफे यांना नियुक्तीपत्रे दिली. 

जिल्हाध्यक्षपदाची स्पर्धा संपली. पक्षाने घेतलेल्या निणर्याचे आम्ही स्वागत करतो. 32 वर्षे मी काँग्रेसचे काम करीत आहे. यापुढेही करत राहीन. पक्षवाढीसाठी कदमांना जे सहकार्य लागेल ते देण्याची आमची तयारी आहे.

- सुधीर दाभोळकर, माजी सदस्य-प्रदेश काँग्रेस कमिटी

 

Web Title: Ratnagiri News Ramesh Kadam as Congress president