नेत्रदीपक शोभायात्रेत श्रीरामाचा जयजयकार

मकरंद पटवर्धन
सोमवार, 26 मार्च 2018

रत्नागिरी - येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिर संस्थेतर्फे रामनवमीचे औचित्य साधून शहरात पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारित सजीव देखावे अप्रतीम सजवण्यात आले. प्रथमच आलेल्या पंजाबी बॅंडने शोभायात्रेची रंगत वाढवली.

प्रतिवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने यात्रेला पाच वाजता सुरवात झाली. रामाची पालखी, हत्तीचा चित्ररथ, अशोकवनामध्ये सीता आणि हनुमंत, प्रभू रामचंद्र असे सजीव देखावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील देखावे केले होते. ढोल-ताशांचा गजर आणि नगारा वाजवण्यात बच्चेकंपनी व तरुणवर्ग पुढे होता. यंदा प्रथमच पंजाबी बॅंड मागवण्यात आला होता. शेर ए पंजाब या बॅंडने शोभायात्रेची रंगत वाढवली. पारंपरिक वेशभूषेत पंजाबी तरुणांनी हा बॅंड नावीन्यपूर्णरीत्या सादर केला. पारंपरिक वेशभूषेत महिला, पुरुष सजले होते.

Web Title: Ratnagiri News Ramnavami festival