रत्नागिरी कारागृहातील शेती कैदी फुलवणार

राजेश शेळके
शुक्रवार, 22 जून 2018

रत्नागिरी - जिल्हा विशेष कारागृहाची ‘खुले कारागृहा’च्यादिशेने वाटचाल सुरू झाली आहे. अनेक वर्षे बंद असलेली सुमारे दीड ते दोन एकरची शेती पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिक्षा संपत आलेले पंधरा ते वीस पक्के कैदी मिळाल्यास कायमस्वरुपी उत्पन्नाचा स्त्रोतही निर्माण होणार आहे. यासाठी कारागृह प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव दिला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला.  

रत्नागिरी कारागृह ‘खुले कारागृह’ व्हावे, यासाठी यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पंचवीस पक्के कैदी ठेवण्याची परवानगी देऊन त्यांच्यामार्फत शेती, भाजी-पाला आदीच्या उत्पादनातून शासनाला उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कामेही होणार असून चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची शिक्षा कमी होण्यास मदत होईल. राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, पैठण आदी ठिकाणी खुली कारागृह आहेत. त्या धर्तीवर रत्नागिरी विशेष कारागृह खुले कारागृह व्हावे, यासाठी मुख्यालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

कारागृहाची क्षमता 204 कैदी ठेवण्याची आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने मोबाईल जामर, सिसी टीव्हीची 24 तास कैदी आणि कर्मचार्‍यांवर नजर आहे. विशेष कारागृहाची 4 हेक्टर 81 गुंठे शेत जमिन आहे. 1 एकर 30 गुंठे जिरायती जमिन आणि दोन हेक्टर जमिन पडिक आहे. आंबे, फणस, नारळ आदी झाडे या परिसरात आहेत. लिलावातूनच वर्षाला साधारण 70 हजार रुपये मिळतात. खुल्या कारागृहाच्या संकल्पनेतून पक्क्या कैद्यांकडून शेती आणि देखभाल केल्यास लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे. 

कारागृहाची मोठ्या प्रमाणात शेती आहे. पक्के कैदी नसल्याने शेती करणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षा संपत आलेले कैदी मिळावेत, यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर केला आहे.
- अमेय पोतदार,
तुरुंग अधिकारी, रत्नागिरी विशेष कारागृह

Web Title: Ratnagiri News Ratnagiri prisoner cultivate jail farm