दिव्यांगांनी अनुभवला व्हॅली क्रॉसिंगचा थरार

मकरंद पटवर्धन
रविवार, 29 एप्रिल 2018

रत्नागिरी - दिव्यांग असूनही आत्मविश्‍वास व जिद्दीच्या जोरावर २५० फूट उंच आणि सुमारे १००० फूट लांब व्हॅली क्रॉसिंग करू शकतो, असा संदेश येथील कै. के. प. अभ्यंकर मूक-बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने व्हॅली क्रॉसिंगच्या उपक्रमात या विद्यार्थ्यांना भाट्ये येथे ही संधी दिली.

रत्नागिरी - दिव्यांग असूनही आत्मविश्‍वास व जिद्दीच्या जोरावर २५० फूट उंच आणि सुमारे १००० फूट लांब व्हॅली क्रॉसिंग करू शकतो, असा संदेश येथील कै. के. प. अभ्यंकर मूक-बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने व्हॅली क्रॉसिंगच्या उपक्रमात या विद्यार्थ्यांना भाट्ये येथे ही संधी दिली.

रत्नागिरीत पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन १ मेपर्यंत केले आहे. याचे उद्‌घाटन पोलिस निरीक्षक ए. एम. खान, ज्येष्ठ नागरिक आशा पंडित आणि पुण्याचे असिस्टंट कमिशनर विलास जाधव यांनी श्रीफळ वाढवून केले. या कार्यक्रमास सकाळ मीडिया ग्रुप पार्टनर होता.

व्हॅली क्रॉसिंगची सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी मूक-बधिर विद्यालयातील अक्षय जाधव, रूपेश झोरे, आदर्श कांबळे, यश देसाई, ऋणाली बडद, सुप्रिया पवार, कशिश नदाफ, गौतमी खडपकर यांनी व्हॅली क्रॉसिंग केले. शिक्षक गजानन रजपूत, सीमा मुळ्ये आणि गायत्री आगाशे, तसेच पालक उपस्थित होते. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे अध्यक्ष शेखर मुकादम, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू, फिल्ड ऑफिसर गणेश चौगुले, जितेंद्र शिंदे, पराग सुर्वे, संजय खामकर, प्राजक्ता राऊत, दीप नाचणकर, सूरज बामणे, हर्षद चौगुले, अक्षय चौगुले, ऋतुजा खानविलकर, हर्ष जैन, नुपूर जैन, संतोष दैत यांनी यशस्वी केला. 

व्हॅली क्रॉसिंगचा थरारक अनुभव मी प्रथमच घेतला. यापूर्वी वॉटर स्पोर्टस्‌, पॅराग्लायडिंग केले आहे. वर आकाश, खाली समुद्र आणि त्यातून दोरीवरून जाताना पहिलाच अनुभव अविस्मरणीय वाटला. यासाठी आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे.
- श्रीमती आशा पंडित
(वय ७२ वर्षे)

जोधपूर, सांगलीतील पर्यटकांचाही सहभाग
पर्यटक रत्नागिरीत राहिला पाहिजे यासाठी धाडसी खेळ, स्कूबा डायव्हिंग यासह पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. वर्षातून दोन वेळा व्हॅली क्रॉसिंग उपक्रम आयोजित केला जाणार आहे. पुण्या-मुंबईप्रमाणे आज जोधपूर, सांगली येथूनही पर्यटकांनी यात सहभाग घेतला.

Web Title: Ratnagiri News Ratndurg Mountaineers speical