भाजप देशहितासाठी कार्यरत - रविंद्र चव्हाण

 भाजप देशहितासाठी कार्यरत - रविंद्र चव्हाण

लांजा - काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या पक्षातील लोक स्वतःच्या हितासाठी कार्यरत आहेत. पण भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. जो देशहितासाठी कार्यरत आहे. भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार नवनविन योजना अमलात आणतेय. या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम बुथ प्रमुखांनी करावे असे आवाहन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

श्री. चव्हाण बुथ प्रमुख कार्यकर्ता संमेलनामध्ये बोलत होते. लांजा तालुक्याचे पालकत्व स्विकारत असल्याची घोषणा यावेळी विधान परिषद सदस्य तथा आमदार प्रसाद लाड यांनी केली. या घोषणेने उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. 

२०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची तालुक्यात बुथ निहाय बांधणी करण्यासाठी लांजा शहरातील संकल्पसिध्दी सभागृह येथे बुथ प्रमुख कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी  राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बोलताना, एक वर्षानंतर मी लांज्यात परत एकदा आलो आहे. पक्षासाठी सर्वसामान्य गाव, खेड्यातला कार्यकता महत्वाचा असतो. आता नेते आपल्या पक्षात नको, तर कार्यरर्ते हवेत. जमलेल्या सर्व कार्यकर्त्यानी एक लक्षात घ्या की, पक्षासाठी रोज दिवसाचा काही वेळ द्यायला हवा.

विधानपरिषदचे आमदार प्रसाद लाड यांनी, राजापुर - लांजा साखरपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रसाद पाटोळे हे आपल्याकडे वारंवार  भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी करत असतात. मी या राजापुर-लांजा-साखरपा मतदार संघाचे नेतृत्व करावे, अशी मागणी करत होते. म्हणून मी आज त्यांच्या मागणीची दखल घेऊन हे घोषित करतो की आजपासून मी या विधानसभा मतदार संघाचे पालकत्व स्विकारत आहे. 

जिल्हाध्यक्ष बाळ माने, राजापूर-लांजा विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रसाद पाटोळे, लांजा तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, उपजिल्हा अध्यक्ष सिताराम सांडम, नगरसेवक उमेश कुलकर्णी , जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा सरचिटणीस विजय कुरुप, माजी जि. प सदस्य वृशाली करुप, नगरसेवक मानसी डाफळे, आमदार प्रसाद लाड, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष भाई जाधव, जिल्हा नेते चंद्रकांत लिंगायत उपस्थित होते. सुत्रसंचालन मांडवकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com