#MPSC रिजवाना ककेरी राज्यात २२ वी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

रत्नागिरी - एमपीएससी परीक्षेत राज्यात २२ वा क्रमांक पटकावत रिजवाना लालसाब ककेरी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरली. पोलिस उपनिरीक्षक होणारी रिजवाना रत्नागिरीतील पहिली मुलगी ठरली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करीत तिने हे यश मिळविले.

रत्नागिरी - एमपीएससी परीक्षेत राज्यात २२ वा क्रमांक पटकावत रिजवाना लालसाब ककेरी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरली. पोलिस उपनिरीक्षक होणारी रिजवाना रत्नागिरीतील पहिली मुलगी ठरली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करीत तिने हे यश मिळविले.

उद्यमनगर येथील औद्योगिक वसाहतीत रिजवाना कुटुंबीयांसह राहते. मोलमजुरी करत आई-वडिलांनी तिला शिकवले. प्रतिकूल परिस्थितीत तिने शालेय शिक्षण सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, तर महाविद्यालयीन शिक्षण गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पूर्ण केले. पुढे ती एलएलबीही झाली. रिजवानाने मोठी अधिकारी व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी तिने कठोर परिश्रम घेतले. तिने पुण्यात सहा आणि कोल्हापुरात काही महिने अभ्यास केला. मैदानी खेळातही तिने राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली.

सलग आठ ते दहा तास अभ्यास करत होते. श्री. मुरकुटे यांच्यासह राजेंद्र साप्ते, नातेवाईक, आई-वडिलांनी दिलेला पाठिंबा खूप महत्त्वाचा होता. दीडशेहून अधिक पुस्तकांचा अभ्यास केला. मेहनत घेतली तर यश अवघड नाही.
- रिजवाना ककेरी,
रत्नागिरी

रिजवानाने तीन वेळा एमपीएससी परीक्षा दिली; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. पण प्रयत्न न सोडता दिवसात बारा तास अभ्यास सुरूच ठेवला. २०१६ च्या पोलिस उपनिरीक्षकपद परिक्षेत अखेर तिच्या मेहनतीचे चीज झाले. रत्नागिरीचे शिक्षण विस्तार अधिकारी एस. जे. मुरकुटे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. 

रिजवानाचा स्वत:वर खूप विश्वास होता. अभ्यासात सातत्य होते. अपयश आले तरी ती खचून गेली नाही. प्रयत्न आणि चिकाटी या जोरावर तिने हे यश मिळविले आहे.
- एस. जे. मुरकुटे, 

शिक्षणविस्तार अधिकारी

Web Title: Ratnagiri News Rijawana Kakeri success in MPSC