नदी पुनरुज्जीवनात ‘मधुरांगण’च्या महिलांचे श्रमदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

रत्नागिरी - परटवणे फणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रमात ‘सकाळ-मधुरांगण’च्या महिला सदस्यांनी सक्रिय भाग घेत सकाळी श्रमदान केले. सोशल मीडियावरील आवाहनानंतर त्यांनी स्वतः या उपक्रमात सहभाग घेतला.

रत्नागिरी - परटवणे फणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रमात ‘सकाळ-मधुरांगण’च्या महिला सदस्यांनी सक्रिय भाग घेत सकाळी श्रमदान केले. सोशल मीडियावरील आवाहनानंतर त्यांनी स्वतः या उपक्रमात सहभाग घेतला.

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सकाळ मधुरांगणच्या माजी संयोजिका उल्का पुरोहित यांनी श्रमदान करूया, असे आवाहन केले. त्यानुसार सदस्य सौ. मिताली भिडे, सौ. अरुणा पेटकर, सौ. उज्ज्वला नेरूरकर, सौ. मनिषा वालावलकर यांच्या टीमने श्रमदान केले. ही मोहीम चांगली असून यामुळे स्वच्छ, शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी किमान एक दिवस श्रमदानास यावे, असे आवाहन या महिलांनी केले आहे.

लोकजागृती करण्याचे आश्‍वासन या उपक्रमातील विद्यार्थ्यांना दिले आहे. या उपक्रमात सर्वप्रथम मधुरांगणच्या सदस्यांनी भाग घेतल्याबद्दल ओंकार गिरकर, साईल शिवलकर यांनी आभार मानले. ५ जूनपर्यंत दररोज सकाळी ८ ते १० या वेळेत सफाई, गाळ काढण्यात येणार आहे.

समाजासाठी हे विद्यार्थी खूप मोठे काम करत आहेत. त्यांच्या कामाने आम्ही खरोखर भारावून गेलो. सकाळी दोन तास आम्ही श्रमदान करून खारीचा वाटा उचलला.
-  मिताली भिडे

मधुरांगणच्या सदस्यांनी ठरवून यात भाग घेतला. फणशीची नदी रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाची आहे. कुदळ, फावडे घेऊन गाळ उपसण्यास सुरुवात केली. दगड गोळा केले. हे काम सर्वांनी एकजुटीने करण्याची गरज आहे.
- उल्का पुरोहित

Web Title: Ratnagiri News River revival by Madhurangan