लांजा तालुक्यातील रिंगणे ग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केला रस्ता

रवींद्र साळवी
गुरुवार, 18 जानेवारी 2018

लांजा - रिंगणेतील प्रलंबित अंतर्गत रस्त्यासाठी वारंवार शासन दरबारी प्रयत्न करुनही शासनाच्या उदासिनतेमुळे रस्ता बांधणीचे काम रखडले होते. अखेर हताश झालेल्या ग्रामस्थांनी श्रमदान व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजित यशवंतराव यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून कोणताही शासकीय निधी न घेता रस्ता तयार केला आहे.

लांजा - रिंगणेतील प्रलंबित अंतर्गत रस्त्यासाठी वारंवार शासन दरबारी प्रयत्न करुनही शासनाच्या उदासिनतेमुळे रस्ता बांधणीचे काम रखडले होते. अखेर हताश झालेल्या ग्रामस्थांनी श्रमदान व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजित यशवंतराव यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून कोणताही शासकीय निधी न घेता रस्ता तयार केला आहे. हा रस्ता तयार झाल्याने येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. 

तालुक्यातील पूर्व भागातील रिंगणे गावातील पेडणेकरवाडीमध्ये झर्ये-वाटुळ या मुख्य हमरस्तापासून वाडीमध्ये जाणारा अंतर्गत रस्ता व्हावा, यासाठी येथील ग्रामस्थ गेली कित्येक वर्षे प्रयत्नशिल होते. या रस्त्याच्या बांधणीसाठी आवश्यक सर्व बाबींची पुर्तता करुन शासन दरबारी रस्ता बांधणीसाठी लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न केले जात होते. परंतु वारंवार प्रयत्न करुन ही शासनाच्या उदासिनतेमुळे या रस्त्यासाठी कोणताही निधी उपलब्ध झाला नाही. यामुळे हताश झालेल्या ग्रामस्थांनी थेट अजित यशवंतराव यांच्याशी सपर्क साधला.

रस्ता बांधणीसाठी आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली. ही मागणी अजित यशवंतराव यांनी मान्य केली. लगेचच कामाला सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी रस्ता बांधणीला हातभार लावावा, या उद्देशाने श्रमदान केले. अशारितीने कोणताही शासकीय निधी न घेता रस्ता तयार करण्यात आला.  

रिंगणेतील पेडणेकरवाडीमध्ये ४० घरे आहेत. मुख्य रस्त्यापासुन काहीशी आतमध्ये ही वाडी वसलेली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना हमरस्तापर्यत पायपीट करावी लागत होती. तर वाडीत कोणी गंभीर आजारी झाल्यास त्याला ही कावडीच्या माध्यामातून मुख्य रस्तापर्यत न्यावे लागत होते. रस्ता नसल्याने येथील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता रस्ता बांधुन पुर्ण झाल्याने येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Ratnagiri News Road developed by Ringane Villagers

टॅग्स