संभाजीराजेंच्या स्मारकाचे सुशोभीकरण स्वाभिमान करेल - नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्‍यात उभारण्यात आलेल्या संभाजी स्मारकाची दुर्दशा पाहून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी या स्मारकाची पाहणी केली. शासन जागे झाले तर ठीक अन्यथा सहा महिन्यांनंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संभाजी स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेईल, असा इशाराही राणे यांनी दिला.

संगमेश्वर तालुक्‍यात महामार्गावरील कसबा येथे संभाजी स्मारकाची उभारणी केली आहे. गेल्या तीस वर्षांत लाखो रुपये या स्मारकावर खर्च झाले; मात्र तरीही हे स्मारक अपूर्णच आहे. स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहेत. ते पाहण्यासाठी येणाऱ्या संभाजीप्रेमींची निराशा होते. अनेक संभाजीप्रेमींनी नीलेश राणे यांच्याकडे स्मारकाच्या दुर्दशेबद्दल माहिती दिली. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेले राणे यांनी संगमेश्वर येथील स्मारकाला भेट दिली.

यावेळी त्यांनी पाहिलेली परिस्थिती संभाजीप्रेमींनी सांगितलेल्या परिस्थितीपेक्षा काही वेगळी नव्हती. अखेर राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना स्मारकाच्या दुर्दशेसंदर्भात पत्र लिहिले. त्यात तातडीने संभाजी स्मारकाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली. या सर्व प्रकारची माहिती राणे यांनी ट्‌विटरवर दिली असून स्वाभिमान सुशोभीकरणाचे काम  हाती घेईल, असेही ठणकावले आहे.

Web Title: Ratnagiri News Sambhaji Raje Memory issue