बाणकोट बंदरात मासेमारीला सॅन्डबारचा अडथळा

सचिन माळी
मंगळवार, 29 मे 2018

मंडणगड - ऐतिहासिक वारसा असलेल्या बाणकोट बंदराच्या मुखावर प्रचंड प्रमाणात सॅन्डबार आहे. जेवढी पाहिजे तेवढी खोली उपलब्ध होत नसल्याने मच्छीमारी, सागरी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने सावित्री खाडीतील जलवाहतूक धोक्‍यात आली आहे.

सद्यःस्थितीत येथील मच्छीमारी आणि सागरी वाहतूक भरतीवर अवलंबून आहे. मच्छीमार पूर्ण वेळ मासेमारी करूच शकत नाहीत. किनाऱ्यावर प्रचंड गाळ असल्याने छोट्या छोट्या बोटीही गाळात रुतून राहत आहेत. खाडी मुखावर साचलेला गाळ काढला तर खाडीतील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

खाडीतील छोट्या जेटी विकसित झाल्या तर बाणकोटपासून अगदी टोलपर्यंत वाहतूक करता येऊ शकते. दळणवळण नसल्याने येथील मच्छीमार सुखी नाही. दिवसातून फक्त चार तासच मासेमारी करावी लागत आहे. आधुनिक बोटी न दिल्याने खोलवर मासेमारी करता येत नाही. किरकोळ मासेमारीमुळे खरेदीदार या बंदराकडे पाठ फिरवतात.

सागरी किनारपट्टी, अनुकूल भौगोलिक रचना, नैसर्गिक देणगी आणि ऐतिहासिक वारसा लाभला असताना शासन, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मंडणगड तालुका बंदर विकासाच्या दृष्टीने आजही वंचित आहे.
- मुश्‍ताक मिरकर, 

तालुकाध्यक्ष काँग्रेस

बंदराकडे शासनाने दुर्लक्ष
बॉक्‍साईटची वाहतूक भरतीवरच अवलंबून असल्याने बार्जेस सहा तास एकाच जागी प्रतीक्षेत राहतात. बाणकोट बंदराकडे शासनाने लक्ष न दिल्याने या पट्ट्यातील अनेक जेटी पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. 

Web Title: Ratnagiri News sandbar obstacle to fishing in Bankot port