सावरकरांच्या कोठडीलगत स्मृती जागवणारे दालन

राजेश शेळके
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात दंड थोपटून काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या वीर सावरकरांचा इतिहास आता डॉक्‍युमेंटरीद्वारे अनुभवता येणार आहे. या वीर पुरुषाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जिल्हा विशेष कारागृहातील त्यांच्या कोठडीशेजारच्या भव्य हॉलचे रूपांतर ‘वीर सावरकर दालना’त करण्यात आले आहे. सावरकरांच्या आजच्या ५२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या दालनाचे उद्‌घाटन करण्यात आले. खऱ्या अर्थाने त्याना ही आदरांजली वाहण्यात आली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे १९२१ ते १९२३ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा कारागृहात ब्रिटिश शासनाने दिलेली कठोर शिक्षा भोगत होते. ब्रिटिशांनी त्यांना जुलमी वागणूक दिली. राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेल्या सावरकरांचे जुलूम वाढेल तसे देशप्रेम वाढत होते. ब्रिटिशांना अद्दल घडविण्यासाठी सावरकरांनी घेतलेली प्रतिज्ञाही पूर्ण केली. अशा या महान वीर पुरुषाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील त्यांच्या कोठडीशेजारी असलेल्या भव्य हॉलचे रूपांतर ‘वीर सावरकर दालना’त करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उद्‌घाटक म्हणून जिल्हाधिकारी प्रदीप पी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, कारागृह अधीक्षक आर. एस. देशमुख, वरिष्ठ तुरूंगाधिकारी सतीश कांबळे, तुरूंगाधिकारी अमेय पोतदार, ॲड. बाबा परूळेकर तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

अतिशय सुंदर पद्धतीने हा स्मृती कक्ष तयार करण्यात आला आहे. या महान राष्ट्र पुरुषाच्या कार्याला त्यामुळे उजाळा मिळत राहील. लोकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढण्यास मदत होईल. सावरकरांची माहिती असणारा फोटो फलकही कारागृहाच्या बाहेर लावण्यात आला आहे.
- प्रदीप पी.
, जिल्हाधिकारी.

सावरकरांना २ मे १९२१ ला अंदमान येथून प्रथम अलीपूरच्या तुरूंगात काही ठेवण्यात आले होते. तेथून त्यांना १६ मे १९२१ ते ३ सप्टेंबर १९२३ या कालावधीत रत्नागिरी विशेष कारागृहात ठेवले. ही कोठडी ६.५ फूट बाय ८.५ फूट लांबी रूंदीची अत्यंत लहान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी शिक्षा भोगलेल्या या कोठडीचे स्मृतिकक्षात रूपांतर करण्यात आले आहे.  

दृष्टिक्षेपात...

  •  कोठडीचे रूपांतर स्मृती कक्षात
  •  नागरिक व पर्यटकांना विनामूल्य खुले
  •  जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी केले कौतुक

कारागृहाची रंगरंगोटी तसेच आजूबाजूच्या परिसराची डागडुजी करण्यात आली. आधी येथे जुने दफ्तर होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर ते अन्यत्र हलवले. सावरकरांची संपूर्ण माहिती असणारे फलक व इतर माहिती नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती कक्ष हे सर्व नागरिक, पर्यटक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विनामूल्य पाहता येईल.

Web Title: Ratnagiri News Sawarkar death anniversary special