लांजा येथील सय्यद चाँदशहा बुखारी दर्गाचा उरूस बुधवारी

रवींद्र साळवी
रविवार, 28 जानेवारी 2018

लांजा - तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शहरातील सय्यद चाँदशहा बुखारी दर्गाचा उरूस बुधवारी ( ता. ३१) साजरा होणार आहे. प्रथेप्रमाणे चाँदशहा बुखारी बाबांचा उरूस हा हिंदू धर्माप्रमाणे माघ पोर्णिमेला तर मुस्लिम धर्माप्रमाणे सफर महिन्याच्या १३ तारखेला होतो.

या वर्षी इंग्रजी तारखेप्रमाणे बुधवारी उरूस होत असून या अगोदर दोन दिवस चुना व संदल हे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. उद्या (सोमवारी) रात्री चाँदशहा बुखारी बाबांच्या दर्गाह मध्ये चुना लावण्याचा कार्यक्रम होईल. मंगळवारी (ता. ३०) रात्री संदल चढविण्याचा कार्यक्रम होईल.

यावेळी भव्य अशी संदल मिरवणूक काढण्यात येते. हे संदल वाजत गाजत बाबांच्या दर्गापासून जुनी बाजारपेठ, पोलीस लाईन, जुनी जामा मसजीद येथे नेले जाते.  तेथे प्रथम संदल चढविले जाते त्यानंतर जामा मस्जिदीकडून नवीन बाजारपेठ मार्गे मिरवणुकीने हे संदल दर्गा मध्ये आणले जाते. 

ऊरुसासाठी लांजा तालुक्यातीलच नव्हे तर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आणि सिँधुदुर्ग या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

Web Title: Ratnagiri News Sayyad Chandshaha Bukhari Darga Urs