रत्नागिरीतील शाळांचे उपक्रम सीमाभागात

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - बेळगाव सीमाभागात मराठी संस्कृती, अस्मिता टिकावी, मराठी भाषेची जपणूक व्हावी व शैक्षणिक क्षेत्रात मराठीचे संवर्धन होण्याकरिता खानापूर तालुक्‍यातील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान कार्यरत आहे. याअंतर्गत प्रतिष्ठान व मराठी अभ्यास केंद्रातर्फे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन या शाळांतील उपक्रम खानापुरात राबवण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांच्यासह  १५ शिक्षकांनी रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर, चिपळूणमधील युनायटेड स्कूल आणि सावंतवाडी, कोल्हापूरमधील शाळांना भेटी दिल्या.

रत्नागिरी - बेळगाव सीमाभागात मराठी संस्कृती, अस्मिता टिकावी, मराठी भाषेची जपणूक व्हावी व शैक्षणिक क्षेत्रात मराठीचे संवर्धन होण्याकरिता खानापूर तालुक्‍यातील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान कार्यरत आहे. याअंतर्गत प्रतिष्ठान व मराठी अभ्यास केंद्रातर्फे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन या शाळांतील उपक्रम खानापुरात राबवण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांच्यासह  १५ शिक्षकांनी रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर, चिपळूणमधील युनायटेड स्कूल आणि सावंतवाडी, कोल्हापूरमधील शाळांना भेटी दिल्या. यापूर्वी २०१५ मध्येही काही शिक्षकांनी महाराष्ट्रातील शाळांना भेटी दिल्या होत्या. त्याचा उपयोग मराठीवृद्धीसाठी झाला. त्यामुळे आताही मराठी शिक्षक, शिक्षिका महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या भेटी देत आहेत. ज्ञानरचनावादी व उपक्रमशील शाळांना भेटी दिल्याने तसे उपक्रम खानापूर तालुक्‍यात राबवले जाणार आहेत.

मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानची २०११ मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून १०० सीमासत्याग्रहींचा सत्कार, संगणक प्रशिक्षण, मराठी जागृती अभियानाअंतर्गत पालकांचे मतपरिवर्तन, शिक्षक परिषद, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, हस्तलेखन स्पर्धा, शैक्षणिक साधनांची निर्मिती असे उपक्रम राबवले आहेत. सीमाभागात मराठी शाळा सक्षम करण्यासाठी प्रतिष्ठानचे प्रयत्न सुरू आहेत. सीमाभागाच्या शैक्षणिक धोरण व विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे प्रतिष्ठानने केली होती.

ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्राच्या साधना गोरे यांनी सांगितले की, ‘श्‍वास मराठीचा... ध्यास गुणवत्तेचा’ हे ब्रीद समोर ठेवून केंद्र कार्यरत आहे. १ डिसेंबर २००७ ला केंद्राची स्थापना झाली. मराठी शाळा, उच्च शिक्षण व मराठी, न्यायव्यवहाराचे मराठीकरण, माहितीचा अधिकार, संगणकीय मराठी व माहिती तंत्रज्ञान, संशोधन प्रकल्प, भाषा व वाङ्‌मय मंडळे, बृहन्महाराष्ट्र, अर्थकारण, माहितीकोष यामध्ये कृतीगट स्थापन करून केंद्र काम करीत आहे.

मराठीच्या संवर्धनासाठी व उन्नतीसाठी मराठी शाळांच्या सक्षमीकरणाची गरज लक्षात घेऊन गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष दिले आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारी शाळांतील शिक्षकांना महाराष्ट्रातील शाळा दाखवल्या. यामुळे शिक्षकांना प्रेरणा व स्फूर्ती मिळाली. मुक्त वातावरणातील प्रयोगशील शाळा नेमक्‍या कशा काम करतात ते कळले.
- नारायण कापोलकर, अध्यक्ष

Web Title: ratnagiri news school marathi school