रत्नागिरी किनार्‍यापट्टीवरील पाणी हिरवे, शेवाळयुक्त

राजेश कळंबटे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - माडवीसह भगवती येथील समुद्राचे पाणी हिरवे आणि शेवाळयुक्त दिसू लागले आहे. याबाबत विविध तर्कवितर्क किनारपट्टीवासीयांमध्ये लढवले जात आहेत. मात्र समुद्रातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढले की समुद्रातील वनस्पती प्लवंग प्रकाशासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येतात व त्यामुळे पाणी हिरवे वा शेवाळयुक्त दिसते, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

कोकण किनारपट्टीवर गेल्या सहा महिन्यांत विविध बदल आढळले आहेत. समुद्रातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यावर काही बदल प्रामुख्याने झाले. त्याचा परिणामक म्हणून दोन महिन्यांपूर्वी अलिबाग (रायगड) येथे मोठ्या प्रमाणात मासळी मिळाली होती. तसाच प्रकार गावखडी येथे घडला होता. सध्या पाण्याचा बदललेला रंग हा अशाच बदलाचा भाग आहे.

समुद्रातील प्राणवायू कमी झाला म्हणजेच कार्बनडायऑक्साईड वाढतो. तेथे हा वायू वापरून वाढणार्‍या वनस्पती वाढतात. त्यांना प्रकाश संश्‍लेषणासाठी प्राणवायू लागतो. त्यासाठी दिवसा मिळणार्‍या प्रकाशासाठी वनस्पती प्लवंग समुद्राच्या पृष्ठभागावर येतात. यामुळेच बुधवारी (ता. 7) दुपारी  किनार्‍यावरील पाणी हिरवे दिसू लागले असावे. काही नागरिकांनी पाण्याचा वास घेऊन पाहिला. त्याला कुबट वास येत होता. काही ठिकाणी शेवाळही पाहायला मिळत होते. या बदलामुळे नागरिकांनी तेलाचा तवंग वाहत आला असावा, अंदाज व्यक्त केला आहे. पाणी दूषित झाल्याचेही शक्यता काहींनी व्यक्त केली. असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

उपयुक्त आणि त्रासदायकही

किनारी भागात आलेले शेवाळ म्हणजे वनस्पती प्लवंग वाढल्याचे लक्षण आहे. त्याच्यावर खाद्य म्हणून अवलंबून असणार्‍या जिवांसाठी ते उपयोगीही ठरते. त्याचे प्रमाण वाढले तर काही जलजीवांसाठी ते त्रासदायक होऊ शकते. कारण यामुळे पुन्हा कार्बनडायऑक्साईड वाढतो व प्राणवायू कमी होतो. त्यासाठी त्यांना पुन्हा पृष्ठभागावर यावे लागते. 

बुधवारी (ता. 7) दुपारपासून किनार्‍यावरील पाणी हिरवे वाटत होते. त्या पाण्याला कुबट वासही येतो. ते पाणी दूषित झाले की काय अशी शक्यता आहे; परंतु याबाबत कोणालाच काही अंदाज नाही. 
- सुनील शिवलकर,
नागरिक

Web Title: Ratnagiri News sea water pollution issue