फळप्रक्रियेतून स्वयंरोजगाराची दारे खुली

मकरंद पटवर्धन
बुधवार, 16 मे 2018

रत्नागिरी - कोकणी मेव्यापासून लोणचे, आमसुले, सरबत, छुंदा असे विविध टिकाऊ व भरपूर पैसे मिळवून देणारे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात आले. यामध्ये 25 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रक्रिया उद्योगातून लघुउद्योग व स्वयंरोजगार मिळू शकतो, असा विश्‍वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला.

पटवर्धन हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, भारत शिक्षण मंडळ आणि शामराव पेजे ट्रस्टच्यावतीने याचे आयोजन केले होते. हायस्कूलच्या सभागृहात दापोली येथील प्रशिक्षिका गीतांजली जोशी व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. गोविंद जोशी यांनी प्रशिक्षण दिले. कच्च्या करवंदांचे लोणचे, पिकलेल्या करवंदांचे सरबत, काजूपासून सरबत, आंब्याचा छुंदा, पन्हे असे पदार्थ यावेळी विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात आले.

उन्हाळ्यामध्ये सुट्टीच्या कालावधीत सहज मिळणार्‍या कोकणी फळांपासून टिकाऊ पदार्थ बनवता येऊ शकतात. विद्यार्थ्यांमध्ये शेती व प्रक्रिया उद्योगाची गोडी आणि उद्योजक मानसिकता तयार व्हावी, या हेतूने हा उपक्रम आयोजित केला. यापूर्वी श्रमसंस्कार शिबिरही संघामार्फत घेतले होते. कृषीसंस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना झाली पाहिजे, अशी माहिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी दिली.

घरच्या घरी बनवता येतील असे अनेक पदार्थ आम्ही शिकलो. परदेशी शीतपेय पिण्यापेक्षा कोकणी फळांची सरबते पौष्टिक आहेत. ती बनवून विकू शकतो. पुढील हंगामात मी स्वतः घरच्यांच्या मदतीने हा व्यवसाय करेन अशी खात्री प्रशिक्षणातून मिळाली आहे.

- मेघा विजय राऊत, एसवायबीकॉम

Web Title: Ratnagiri News self employment in Food Processing