कोकणातील शिमगोत्सवास प्रारंभ (व्हिडिआे)

अमोल कलये
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - कोकणात सर्वात मोठ्या सण म्हणून आेळखले जाणाऱ्या शिमगोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. रत्नागिरी येथील काजरघाटीच्या महालक्ष्मी देवीचा शिमगोत्सव तेरसे शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो.

रत्नागिरी - कोकणात सर्वात मोठ्या सण म्हणून आेळखले जाणाऱ्या शिमगोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. रत्नागिरी येथील काजरघाटीच्या महालक्ष्मी देवीचा शिमगोत्सव तेरसे शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो.

सोमवारी पालखीला रुप लावली गेली. म्हणजे देव सजवले गेले. आज होळी तुटली .ही तो़डलेली होळी आज वाजत गाजत खांद्यावरुन खेळवत गावात आणण्यात आली. उद्या ही होळी ग्रामदैवतेच्या मंदिराजवळ उभी केली जाईल.

गेल्या अनेक वर्षापासून शिमगोत्सवाची अशीच परंपरा आहे. भद्रे आणि पौर्णिमेला देखील शिमगोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो. आता पुढील काही दिवस कोकणात शिमगोत्सवाची दुम पहायला मिळणार आहे. शिमगोत्सवासाठी कोकणात मुंबईतील चाकरमणी दाखल होतात. 

Web Title: Ratnagiri News Shimaogushav Starts in Konkan

टॅग्स