सागरमालाअंतर्गत जिल्ह्यात ६ बोट टर्मिनस

सागरमालाअंतर्गत जिल्ह्यात ६ बोट टर्मिनस

देवरूख - केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत कोकणातील बंदरे जोडण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यासाठी १२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बंदर विकास विभागाकडून संगमेश्‍वर तालुक्‍यातील करजुवे ते कोंडिवरे-कळंबुशी असे सर्वेक्षण करण्यात आले. यात कुरधुंडा, करजुवे, माखजन, बुरंबाड आणि कोंडीवरे कळंबुशी येथे बोट टर्मिनस बांधण्यात येणार आहे. जलपर्यटनाच्या दृष्टीने हा भाग विकसित करण्यात येईल. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. उल्काताई विश्‍वासराव प्रयत्न करीत आहेत. 

इतिहासजमा झालेली बंदरे विकसित करून संगमेश्‍वर, रत्नागिरी, गुहागर आणि चिपळूण तालुक्‍यांतील खाडीलगत असणारी गावे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नदी विकास खात्याचा अतिरिक्‍त कार्यभार आल्यानंतर गडकरी यांनी पुन्हा कोकणवर मेहेरनजर करीत सागरमाला योजनेंतर्गत कोकणातील पहिल्याच १२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्यशासनाकडून प्रत्येकी ५० टक्‍के निधी मिळणार आहे. यासाठी शनिवारी करजुवे खाडीत बंदर विकास खात्याकडून सर्वेक्षण करण्यात आले. कुरधुंडा, नावडी, फुणगूस, करजुवे, माखजन, कोंडीवरे, आरवली आदी भागांत बोटीद्वारे फिरून संभाव्य बोट टर्मिनसच्या जागांची पाहणी करण्यात आली. यासाठी नदीतील गाळाचा अंदाज घेण्यात आला. तो काढण्याचे काम सर्वप्रथम केले जाणार आहे. 

या सर्वेक्षणात पं. स. सदस्य सुभाष नलावडे, बावा चव्हाण, राकेश जाधव, शैलू धामणसकर, समीर पाटणकर, जाकीर शेकासन, प्रशांत विचारे, श्रीकांत नलावडे, प्रशांत रानडे, सतीश चव्हाण, बंदर विकास खात्याचे मुुख्य कार्यकारी अभियंता दुधीर देवरे, सहायक अभियंता डी. एस. मंजुळे, शाखा अभियंता पी. डी. शिंदे, सहायक बंदर निरीक्षक एच. व्ही. मुल्ला, राजाराम राव सहभागी झाले होते. करजुवेचे उपसरपंच शामसुंदर माने यांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com