रत्नागिरी उपनगराध्यक्षपदी स्मितल पावसकर बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  अपेक्षेप्रमाणे येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. स्मितल पावसकर यांची आज बिनविरोध निवड झाली. पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. पालिकेत पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदा महिला उपनगराध्यक्षपद भूषविण्याचा मान सौ. पावसकर यांना मिळाला.    

राजेश सावंत यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली. नगराध्यक्ष राहुल पंडित पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. बारा वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानंतर गरज भासल्यास विशेष सभा बोलवून निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार होती. उपनगराध्यक्ष पदासाठी सौ. स्मितल पावसकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी श्री. पंडित यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

सौ. पावसकर या स्वच्छता समितीच्या सभापती होत्या. या पदाचा राजीनामा घेऊन त्यांनी अर्ज भरला. पालिकेला पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदा महिला उपनगराध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळाला आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह नगराध्यक्ष राहुल पंडित, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, महिला नगरसेविका, सेना पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेट्ये आदी उपस्थित होते.

Web Title: ratnagiri news Smital Pawaskar selected as Deputy head of City