‘महाराष्ट्र तंत्रनिकेतन’मध्ये साकारली स्पोर्टस्‌ बाईक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मंडणगड - शेणाळे (ता. मंडणगड) येथील महाराष्ट्र तंत्रनिकेतन कॅम्पसमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाईक बघायला मिळतेय. ही बाईक तृतीय वर्षाच्या मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्‍टसाठी बनवली असून ‘सिंगल स्विंग आर्म स्पोर्टस्‌ बाईक’ असे या बाईकचे नाव ठेवले आहे. मंडणगडसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बनवलेली बाईक कौतुकाचा विषय ठरली आहे. 

या गाडीचा आकार एअरोडायनॅमिक असून त्यामुळे आकर्षक लूक मिळाला आहे. वेगासाठी हा आकार महत्त्वाचा ठरतो. 
गाडी बनवण्यासाठी अंकित मिरजीलकर, सुमित जाधव, विनय अहिरे, स्वप्नील महाडिक, शुभम म्हात्रे आणि शाखेच्या इतर विद्यार्थ्यांनी योगदान दिले. त्यांना विभागप्रमुख प्रा. सुनील खैर, प्रा. महेश पाचे, सदानंद गुरव, रूपाली पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. 

संस्थाध्यक्ष अजय दळवी, श्वेता दळवी, प्राचार्य महेश परीट, श्री. सनगरे, प्रा. मैथिली पाटील, श्री. शेट्ये यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Ratnagiri News Sport Bike by Maharashtra Technicon