भरकटलेल्या तरुणाईचे चित्रण - कॉफी

भरकटलेल्या तरुणाईचे चित्रण - कॉफी

शास्त्रीय संगीताची परंपरा वाढीस लागावी यासाठी ‘खल्वायन’ रत्नागिरी संस्थेने संगीत नाटकांचे उत्तम प्रयोग करून आपला आलेख उंचावत ठेवला आहे. याआधी गद्य नाटकातून एक कप चहासाठी, चिनूचे घर, प्रश्‍न तुमच्या निर्णयाचा अशी दर्जेदार नाटके स्पर्धेत केली. नवोदित, बालकलाकार तसेच तरुणाईला वाव मिळावा, यासाठी महेंद्र तेरेदेसाई लिखित ‘कॉफी’ या नाटकाचा प्रयोग दिग्दर्शक प्रणय यादव यांनी साकारला. ‘पेपरलेस जनरेशन’च्या व्यथा ज्येष्ठ रंगकर्मी प्रफुल्ल घाग यांच्या साथीने व्यक्त करण्यात आल्या.

काय आहे नाटक?
जाहिरात क्षेत्रात मोठे नाव असलेला अद्वैत मनाने हळवा मात्र तत्वज्ञान सांगत असतो. पत्नी अरुंधती घटस्फोट घेते. बालवयात मुलगा ओम वडिलांकडे राहणार असे सांगतो. आईचेही प्रेम देत अद्वैत त्याला वाढवतो. दोघांचे मित्रत्वाचे नाते निर्माण होते. वडिल अनुभवी, तत्वज्ञानी व तरुण मुलगा एकमेकांना साथ देतात. रोजची ‘कॉफी‘ पिणे हा दोघांमधील दुवा असतो. ओम वडिलांच्या गळ्यातील ताईत असतो. ओमच्या जीवनात वकीली शिकणारी मुलगी वैदेही येते. त्याला वडील लग्न करण्यास सांगतात पण तो तीन वर्षे लग्न करणार नाही सांगतो. वैदेही मैत्रीण आहे असे सांगून वेळ मारून नेतो. आईचे छत्र नसल्यामुळे तो थोडा भावनिक असतो. वैदेही त्याला तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलाबरोबर लग्न करणार असल्याचे सांगते. नाटकाच्या उत्तरार्धात ओमचा अपघात होतो. वैदेही सेवासुश्रुषा करण्यासाठी त्याच्या घरात येते. दोघेही मैत्रीने बद्ध असतात. ओमच्या मनात तिच्याबद्दल ओलावा निर्माण होतो. तो तिच्यापुढे  आपले प्रेम व्यक्त करणार असतो. पण इकडे वैदेही ओमचे वडील अद्वैत यांच्या प्रेमात पडते. वडिलांच्या वागण्याचे  ओमला कोडे पडते. अखेर कोडे सुटते. वैदेही ओमला त्याच्या वडिलांवर प्रेम करते असे सांगून मोकळी होते. ओमच्या मनाला धक्का बसतो. त्याचवेळी वडील घरी येतात. जाहिरात मार्केटिंग या विषयावर सोशल मीडियावर लाईव्ह प्रोग्राम सुरू असतो. सध्याच्या पेपरलेस जनरेशन, तरुणाई या विषयी बोलताना परंपरा आणि आधुनिकता यात फरक आहे. आजच्या मुलींची विचारसरणी चुकीची आहे. दुप्पट वयाच्या मुलाशी संबंध ठेवतात. खरं प्रेम काय हे या जनरेशनला कळत नाही असे अद्वैत सांगतो. वैदेही ते सारे ऐकते आणि निघून जाते.     

दिग्दर्शकाचे मत
आजच्या तरुणाईला काय चांगले आणि काय वाईट याची जाण नसते. भरकटल्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीवर विश्‍वास ठेवतात. नव्याचा ध्यास, बी प्रॅक्‍टीकल, यामुळे व्यथा तयार होतात. एखाद्या गोष्टीने भारावून जाणे हे तरुणाईत घडत असते. या नाटकातून खऱ्या प्रेमाची अनुभूती तसेच प्रबोधन व्हावे यासाठी ‘काॅफी’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत केले. 
- प्रणव यादव

पात्र परिचय
अद्वैत - प्रफुल्ल घाग, वैदेही - तेजश्री दाते, ओम -प्रणव यादव.

सूत्रधार आणि सहाय्य
सूत्रधार - आशय भुरवणे, नेपथ्य - ऋषीकेश लांजेकर, प्रकाश योजना - ओंकार धनावडे, पार्श्‍वसंगीत - गौरव महाजनी, रंगभूषा - सचीन गावणकर, वेशभूषा - श्‍वेता कुंडले, रंगमंच व्यवस्था - अभिषेक रजपूत, सचीन वीर, विराज माने, सुशाम शेमबवणेकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com