खडतर परिश्रमानंतर शुभम सबलेफ्टनंट

मकरंद पटवर्धन
बुधवार, 16 मे 2018

रत्नागिरी - सात वर्षे सैनिकी शाळेत शिस्तबद्ध प्रशिक्षण, नंतर एलिमला-केरळच्या इंडियन नेव्हल ॲकॅडमीमध्ये चार वर्षे नेव्हल, बी.टेक.चे शिक्षण घेऊन येथील शुभम खेडेकर सबलेफ्टनंट होणार आहे. कठोर व खडतर परिश्रमातून त्याने हे लक्ष्य गाठले आहे. त्याचा हा प्रवास विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

रत्नागिरी - सात वर्षे सैनिकी शाळेत शिस्तबद्ध प्रशिक्षण, नंतर एलिमला-केरळच्या इंडियन नेव्हल ॲकॅडमीमध्ये चार वर्षे नेव्हल, बी.टेक.चे शिक्षण घेऊन येथील शुभम खेडेकर सबलेफ्टनंट होणार आहे. कठोर व खडतर परिश्रमातून त्याने हे लक्ष्य गाठले आहे. त्याचा हा प्रवास विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

प्रचंड मेहनत व इच्छाशक्तीच्या जोरावर शुभमने ही मजल मारली, असे शुभमची आई दीप्ती व वडील देवदास खेडेकर यांची ‘सकाळ’ला सांगितले. इयत्ता पाचवीमध्ये शुभमने सातारा येथील सैनिकी स्कूलसाठी परीक्षा दिली. शिक्षक श्री. भेलेकर, राठोड, कडवईकर व श्रीमती मुळ्ये व आई  दीप्ती यांच्याकडून पाच दिवसांत त्याने मार्गदर्शन घेतले.लेखी,तोंडी परीक्षांसह वैद्यकीय चाचण्यांद्वारे सैनिकी शाळेत दाखल झाला. सैनिकी शिस्त त्याने अंगी बाणवली आणि बारावीपर्यंत तेथे शिक्षण घेतले. बारावीत त्याने यूपीएससी, एसएसबी या परीक्षांमध्ये यश मिळवले.

आयएनएमध्ये प्रवेशासाठी सैनिकी स्कूलमध्येच तयारी करून घेतली.सुरवातीपासूनच कठीण प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय चाचणी यातून शुभमला आयएनएमध्ये प्रवेश मिळाला. व्यक्तिगत यश मिळाले तरी एकाच्या चुकीमुळे संपूर्ण गटसुद्धा बाद होऊ शकतो,अशा खडतर काळातून शुभम सामोरा गेला. शुभमने सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावले. दहावीत ८८ व बारावीमध्ये ७८ टक्के गुण मिळवले. तो पुणे, बंगळूर येथे पुढील परीक्षांच्या मार्गदर्शनाकरीता गेल्याने अनेक वर्षे मोठी सुटी घेतलेली नाही.

शुभमने लहानपणीच सैनिकी क्षेत्रात जायचे नक्की केले. सैनिकी शाळेत असताना त्याला पालक या नात्याने प्रोत्साहन, पाठिंबा व मनोधैर्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पालकांनीही प्रोत्साहन दिल्यास पाल्यांना भरपूर संधी उपलब्ध होतील.
 - दीप्ती खेडेकर

Web Title: Ratnagiri News Subham Khedekar success story