सावर्डेच्या मातीतील ऊसाला न्यारा गोडवा

प्रकाश पाटील
बुधवार, 9 मे 2018

सावर्डे - चिपळूण तालुक्यातील कोसंबी गावचे पण सावर्डे भुवडवाडीत वास्तव्यास असलेल्या वसंत झोरे त्यांची पत्नी वासंती व तीन मुलांनी सात एकर स्वमालकीच्या जमिनी पैकी दीड एकरात ऊस आणि अर्धा एकरात भुईमूग लागवड करुन माळरानाचे ऊसाच्या मळ्यात रुपांतर केले आहे.

कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य कशी करता येते हे झोरे कुटुंबीयांनी सिध्द केले आहे. झोरे हे धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते. त्यांची विजय, अजय, सागर या मुलांना शेती करण्याची आवड. विजय आणि अजय दोघे बी. एस्सी. अ‍ॅग्री तर सागरचे बी. टेक. शिकत आहे. मुले उच्चशिक्षित असली तरी सकाळी पाच वाजता उठून गुरांचे शेण काढणे, दुध काढून रतिबांना देणे, शेतात कष्ट करुन मगच कॉलेजला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. 

जिल्ह्यातील चालणार्‍या रसवंती गृहांना ऊस पुरविण्याच्या हेतूने दीड एकरात 86032 जातीच्या ऊसाची लागवड केली. तीन किलोमीटर अंतरारुन शेतीला पाणी आणले आहे. दोन विहिरीतून देखील उपसा केला जातो. शेळीमेंढी  कुक्कुट, गुरे पालन असे जोडधंदे आहेत. ऊसातून सुमारे दीड तर भुईमुगातून 25 हजार रुपये निव्वळ नफा होऊ शकतो. हा त्यांचा अंदाज आहे. 

मुलांना शेतीत करियर करायचे आहे.माझ्या मुलांनी कृषीविषयक शिक्षण घेतले आहे. नोकरीच्या मागे न लागता  शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनावर प्रक्रिया पुढील पूरक व्यवसायाची निर्मिती करायची आहे.

- वसंत झोरे

Web Title: Ratnagiri News Sugarcane in Sawarde