महाआघाडी २०१९ मध्ये परिवर्तन घडवेल - सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

रत्नागिरी - 'राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या चार वर्षांच्या कारभाराविरुद्ध जनतेमध्ये रोष आहे. बिगर भाजप धर्मनिरपेक्ष सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन महाआघाडीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनादेखील आमच्याबरोबर राहील, अशी अपेक्षा आहे. २०१९ च्या निवडणुकीत नक्कीच राज्यात परिवर्तन होईल,’ असा आत्मविश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘राज्यात भाजपची पीछेहाट व्हायला सुरवात झाली आहे. अनेक निवडणुकांमध्ये ते दिसून आले. वाढती महागाई, नियंत्रणात न राहिलेले पेट्रोल, डिझेलचे दर, महागलेला गॅस सिलिंडर, बेरोजगारीचा प्रश्‍न आदींमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बिगर भाजप सर्व वज्रमूठ बांधण्यास तयार झाले आहेत. शिवसेनादेखील यात सामील होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र त्यांनी थोडं थांबण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु २०१९ ला राज्यात परिवर्तन होणार, हे निश्‍चित आहे. त्यासाठी महाआघाडी सज्ज झाली आहे.'' 

गीतेंना जागा दाखवू

खासदार अनंत गीते चार वर्षांमध्ये निष्क्रिय ठरले आहेत. त्यांनी केलेले एकतरी ठोस काम दाखवावे. गेल्या निवडणुकीत २३०० मतांनी माझा पराभव झाला. त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. मात्र आता शेकाप, काँग्रेस आम्ही एकदिलाने काम करीत आहोत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे मला तिकीट मिळेल किंवा नाही याची माहिती नाही. मात्र अनंत गीते असतील तर त्यांच्याविरुद्ध लढायला नक्कीच आवडेल. त्यावेळी त्यांना त्यांची जागा दाखवूनच देऊ, असे खुले आव्हान तटकरे यांनी दिले.

Web Title: Ratnagiri News Sunil Tatakare Press